Breaking News

जितेंद्र आव्हाडांना आधी १४ दिवसांची कोठडी आणि जामीन

साधारण मागील आठवड्यात हर हर महादेव या मराठी चित्रपटात शिवकालीन इतिहासात मोडतोड केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील व्हिव्हिएना मॉलमध्ये जात या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच तेथील एका प्रेक्षकाला मारहाणीचा एक व्हिडिओही प्रसारीत झाला. त्यानंतर आव्हाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांना काल संध्याकाळी ठाणे पोलिसांनी अटक केली. रात्र पोलिस ठाण्यात काढल्यानंतर आज १२ नोव्हेंबर रोजी जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. काही वेळानंतर आव्हाड यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. त्यावेळी न्यायालयाने १५ हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करत जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर केला.

कोर्टात हजर करण्यात आलं असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यात आता न्यायालयाने आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे.

‘हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ७ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. याच कारणामुळे ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी जितेंद्र आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अटक केली होती. आज आव्हाडांना न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या १२ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल आणि आज ठाण्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली. जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरु केला.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *