Breaking News

चलाखीने अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दोन मिनिटांत मंजूर राज्य सरकारची विरोधकांवर कुरघोडी

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. मात्र विरोधकांचा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांवरील ठराव मांडत आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करत गाफील विरोधकांवर राजकीय कुरघोडी करत चांगलीच धोबी पछाड दिली.

साधारणत: दुपारी विधानसभेत अर्थ विभागाची कर प्रणाली लागू करण्यासंदर्भातची दोन विधेयके राज्य सरकारकडून मांडण्यात आली. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा ही करण्यात आली. मात्र त्यानंतर अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर सभागृहाचा विश्वास असल्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी सदर प्रस्ताव मांडण्यात आल्याचे जाहीर केले. त्यास लगोलग शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावालाअनुमोदन देत जाहीर केले. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी सदर प्रस्तावावर आवाजी मतदान घेतले. त्यास भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार सहमती दर्शवित दोन मिनिटात अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला.

सुरुवातीला विरोधकांना त्यांनीच मांडलेला प्रस्ताव चर्चेला येत असल्याचा भ्रम झाला. मात्र त्यावर कोणतीही चर्चा न पुकारता सदर प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाकडून आवाजी मतदान घेत विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घेत असल्याचे लक्षात येताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य उठून उभे राहून त्यास विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करे पर्यंत तालिका अध्यक्षांनी विश्वास दर्शक ठराव मंजूर करून सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूबही केले. त्यामुळे विरोधकांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहीला नाही.

तसेच विरोधकांकडून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या प्रस्ताव सभागृहात येवूच न दिल्याने विरोधकांना तोंड दाबून बुक्याचा मार खावा लागला.  तर राज्य सरकारच्या या खेळीमुळे राज्य सरकारवर आलेले गडांतर लिलया परतवून लावले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *