Breaking News

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील वेळापत्रक राहणार असे

जवळपास एक महिन्याहून अधिक काळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यांत्रा कन्याकुमारी, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणानंतर आता ही यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रवेश करत आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राहणार आहे. तसेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अर्थात जवळपास १४ दिवस ती महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून पुढे जाणार आहे.

महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर देगलूर येथे या यात्रेचा मुक्काम राहणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता देगलूरहून पुढे मार्गस्थ होणार आहे. दुपारी ३.३० वाजता खतगाव फाटा, बिलोली येथे थांबणार. तिसऱ्या दिवशी ९ तारखेला ती शंकरनंगर-रामतीर्थ येथून पुढे मार्गस्थ होत नायगाव येथे दुपारी कुसुम लॉन येथे थांबणार आहे. त्यानंतर लोका कंधार, देगलूर नाका, भोकर, कळमनूरी मार्गे हिंगोलीत प्रवेश करणार. त्यानंतर हिंगोलीतून वाशिम जिल्ह्यात, नंतर रिसोड बाळापूर, जळगांव जामोद मार्गे पुढे ती मध्य प्रदेशात जाणार आहे.

जवळपास हे चार जिल्ह्याचे अंतर पार करायला भारत जोडा यात्रेला १३ दिवस लागणार आहेत. या यात्रेतील कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची आणि त्यांच्या राहण्या खाण्याची जबाबदारी स्थानिक काँग्रेसच्या जिल्हा कमिटीवर सोपविण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

Check Also

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *