Breaking News

डॉ नीलम गोर्‍हे म्हणाल्या, उध्दव ठाकरेंचे नेतृत्व देशस्तरीय

शेतकर्‍यांची जी परवड झाली आहे. अवकाळी पावसाने जी शेतकर्‍यांची नुकसाने झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना आला की काय अशी परिस्थिति शेतकर्‍यांची झाली आहे. अनेक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या घडत आहेत. शेतीला आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पुरेशी मदत शासनाकडून मिळत नाही. यामुळे ते हवालदिल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज २३ ऑक्टोबर २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात भेट दिली आहे. स्थानिक शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही भेट दिल्याचे शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

एक वेगळ्या पद्धतीचा दिलासा आणि शेतकर्‍यांना एक आत्मविश्वास मिळवून देण्यामध्ये उद्धवजीचा फार मोठा सहभाग आणि अनुभव मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला परिचित आहे. यापूर्वी अनेकदा त्यांनी शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन संवाद साधलेला महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आम्ही स्वत: देखील अनेकदा याचे साक्षीदार आहोत. यासोबतच राज्याचे प्रशासन, राज्यकर्ते यांची देखील कामाची गती उद्धव साहेबांच्या सहभागाने वाढत आहे असा अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात भेट देत असताना उद्धव साहेबांच्या देशस्तरीय नेतृत्वाला मानणारा अनेक वर्ग या निमित्ताने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर दिलासादायक कृती नक्कीच होईल अशी अपेक्षा ठेवून आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या शेतकर्‍यांवर आलेल्या या संकटात ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या अगोदर मा. उद्धव साहेब महिला शेतकर्‍यांच्या मागे भावाप्रमाणे उभे राहत आहेत. त्यांचे सर्व समावेशक नेतृत्व शेतकरी आणि राज्यातील जनतेला दिलासा देणारे आहे. या अर्थाने आजच्या त्यांच्या या दौर्‍याला राज्यातील जनतेच्या मनात विशेष महत्व आहे हे नाकारून चालणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *