Breaking News

दसऱ्याची रेल्वे कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी बोनस देण्यास केंद्राची मंजूरी फक्त गॅझेटेड अधिकारी वगळता रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

कोरोना काळात रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झालेला असल्याने आणि केंद्र आणि राज्य सरकारनेही कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती कोरोना पुर्व काळासारखी आता पुन्हा निर्माण होत आहे. तसेच आर्थिकसह अनेक गोष्टी पूर्व पदावर येत आहेत. त्याचबरोबर कोरोनानंतर पहिल्यांदाच मोकळ्या वातावरणात दसरा उत्साहात साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वेतील गॅझेटेड अधिकारी वगळता सर्व कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांना बोनस देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केल्याप्रमाणे, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचे वेतन हे बोनस स्वरूपात देण्यात येणा आहे.  रेल्वे कर्मचाऱ्यांना मुळ वेतना इतके अर्थात ७००० रूपये इतके आणि त्यात प्रॉडक्टीव्हीटी व्हेजेस (वेतन) अॅड करून जी जमा होणारी रक्कम असेल ती बोनस स्वरूपात रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

मात्र बोनस देण्यासाठी ज्या कर्मचाऱ्याचे रेकॉर्ड सातत्याने गैरहजर राहणारे नसावे, त्याच्यावर कोणत्याही पध्दतीची कारवाई झालेली नसेल, आणि नोकरी सोडलेली नसावी अशाच कर्मचाऱ्यांना हा दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे परित्रकात नमूद कऱण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेच्या सरसकट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता दुरावली आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *