Breaking News

मंत्रिमंडळातील समावेशावरून प्रताप सरनाईक यानी व्यक्त केली तीव्र नाराजी प्रताप सरनाईक अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मतभेदाच्या चर्चेला उधाण

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन अडीच तीन महिने उलटत नाही तोच या सरकारमध्येही सगळे काही ठाकठिक सर्वकाही अलबेल आहे असे म्हणता येणार नाही. कोणी मंत्री पदावरून नाराज तर कोणी पालकमंत्री निवडीवरुन नाराज, कोणी चांगलं खातं मिळालं नाही म्हणून मंत्री पदावरून नाराज.

एकूण सर्वत्र नाराजी दिसून येते. काही आमदार म्हणतात माझ्या पेक्षा तो लहान मी नेता असताना तो चटया उचलत होता आज तो मंत्री होतो. अशा लोकांना मंत्री पदं मिळतात मात्र आमच्या सारख्यांना डावललं जातं अशा प्रकारे या सरकार मध्ये नाराजही नाराजी दिसते.

आता ठाणे या एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे निकटवर्तीय प्रताप सरनाईक आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहेत. अशातच प्रताप सरनाईक यांच्या मुलाने ‘दो दिल एक जान है हम्म’ असे ट्विट केल्याने नक्कीच काहीतरी बिनसले असल्याचे दिसून आले होते.

या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषयच मिटवला. आता आम्ही दोघे बरोबरच आहोत, हे तुम्ही पाहत असताना कसले मतभेद? (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक दोघेही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एका कार्यक्रमात एकत्र होते ) असे म्हणून त्यांनी सर्वकाही अलबेल असल्याचे सांगितले पण सरनाईक यांचे हावभाव मात्र काही औरच सांगत होते. सरनाईक आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतभेदातील चर्चेला नक्कीच उधाण आले आहे हे मात्र खरे.

दरम्यान, कार्यक्रमाअगोदर प्रताप सरनाईक हे मोबाईल फोनवरून आपला मंत्रिमंडळात समावेश केला नसल्यावरून आपली नाराजी एका तिसऱ्याच नेत्याला सांगत होते. तसेच यावेळी त्यांनी शिंदे गटातील एकूणच कारभारावरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रताप सरनाईक यांना स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलावून बसविले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *