Breaking News

राऊत कोठडीत गेल्यानंतर सर्वानाच एक प्रश्न, ईडी कोठडीत काय करत असतील? नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या मिटींगा

पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऐरवी त्यांचा दिवस राजकिय घडामोडी आणि वक्तव्यात जातो. मात्र संजय राऊत यांना तुरूंगात गेल्यानंतर त्यांचा दिवस कसा जात असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आपच्या मराठी ई-बातम्या.कॉमच्या प्रतिनिधीने याविषयीचा कानोसा घेतला असता संजय राऊत यांना सामान्य बराकीत न ठेवता विशेष कैद्यांसाठी असलेल्या खोलीत ठेवण्यात आले आहे. या खोलीत ते एकटेच आहेत. मात्र, जेवण, नाष्टा घेण्याच्या वेळी लॉकअप उघडले जाते. यापूर्वीच या जेलमध्ये असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासोबत राऊतांच्या भेटी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तिघांनाही विशेष कैदी म्हणून वागवले जात आहे. बहुचर्चित प्रकरणांतील आरोपी विशेष कैदी म्हणून गणले जातात. विशेष कैदी असल्यामुळे या तिघांनाही सामान्य बराकीऐवजी १० बाय १० आकाराच्या स्वतंत्र खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. या खोल्यांत पंखा, स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. या रूममध्ये अन्य कुणी कैदी नसल्याने एकांतातच दिवस काढावे लागतात. फक्त जेवणाच्या वेळी सर्व कच्च्या कोठडीतील कैद्यांना बराकीबाहेर येण्याची मुभा असते.

सकाळी ६ वाजता सर्व कैदी उठतात. साडेसात वाजेपर्यंत नाष्टा घेण्यासाठी तयार होतात. साडेसात वाजता सर्व बराकी उघडल्या जातात. कैदी आपापला नाष्टा घेऊन बराकीत जातात. ९ वाजता कारागृह अधीक्षकांची संचारफेरी होते. या फेरीदरम्यान सर्व कैद्यांना आपापले हिस्ट्री कार्ड समोर धरून उभे राहावे लागते. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांनाही हे कार्ड घेऊन उभे राहावे लागते. या कार्डवर गुन्ह्याचा तपशील लिहिलेला असतो.

सकाळी साडेदहा आणि सायंकाळी पाच वाजता कैद्यांना जेवण दिले जाते. जेवण घेण्यासाठी हे कैदी आपापल्या बराकीतून बाहेर येतात. तेवढ्या वेळेत आपापल्या ओळखीतील कैदी एकमेकांशी बोलतात. अगदी तसेच राऊत, देशमुख आणि मलिक हे तिघे जेवणाच्या वेळी बाहेर येण्याची मुभा असलेल्या वेळेतच एकमेकांना भेटतात आणि बोलतात, अशी माहिती आहे.

इतिहासातील पहिलीच वेळ…
ईडीने अटक केल्यानंतर ८ ऑगस्टला राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. याच जेलमध्ये माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हेदेखील न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात एकाच वेळी तीन बडे राजकीय नेते एकाच कारागृहात कोठडीमध्ये असण्याची ही बहुधा इतिहासातील पहिलीच वेळ असेल.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *