Breaking News

अजित पवार म्हणाले, सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा एकच आवडता शब्द… शहिद आणि सरकारच्या भवितव्यावरून अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जवळपास सव्वा महिना पूर्ण झाला. त्यानंतर या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. परंतु या मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ गावी अर्थात तापोळा-दरे गावात स्थानिक नागरीकांकडून नागरी सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तर…मी शहीद होण्याचा धोका होता, मी शहीद झालो असतो, असे वक्तव्य केले.

त्यांच्या या वक्तव्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, त्यांच्या मनात अशी भीती का यावी? ते राजकीय शहीद झाले असते की खरोखर शहीद झाले असते ते कसं सांगावं? त्यांच्या शहिद वापरलेल्या शहिद या शब्दाचे अनेक अर्थ निघतात. त्यामुळे आपण त्यांच्या शहिद या शब्दाबद्दल नेमके काय सांगावे असे स्पष्ट करत पण राज्यातल्या जनतेला या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आत्तापर्यंत एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगितलेला असताना आपणच खरी शिवसेना असल्याचा देखील दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत शिंदे गटाचं पहिलं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. तो विषय न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर आहे. कुणी कुठे कार्यालय काढायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण कार्यालय काढल्यानंतर तिथे लोक सुद्धा भेटायला यायला पाहिजेत. लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे. लोक बघत आहेत. यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी फोडाफोडी केली की जनतेसाठी केली हे जनता ओळखते, असे ही ते म्हणाले. याआधी ठाकरे सरकारच्या काळात भाजपाकडून सरकार कोसळण्याचे मुहूर्त दिले जात होते. मात्र, आता अजित पवार यांनी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल का? या प्रश्नावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. कुणाचंही सरकार आलं, तरी जोपर्यंत १४५ चा जादुई आकडा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता, तोपर्यंतच ते सरकार टिकत असतं. आत्ताचा विचार करता ज्या दिवशी ते १४५ चा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत, त्या दिवशी हे सरकार कोसळेल असे सूचक विधान त्यांनी केले.

तसेच सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा एक शब्द फारच आवडता बनला आहे. तो म्हणजे “लवकरात लवकर” हा शब्द बनला आहे. काल परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खाते वाटप करण्याबाबतचा प्रश्न विचारला त्यावेळीही त्यांनी लवकरात लवकर हाच शब्द वापरला. अधिवेशन दोन-तीन दिवसांवर आले आहे. मंत्र्यांना खाते वाटप व्हायला पाहिजे. कारण अधिवेशनात मंत्र्यांच्या नावाने छापील उत्तरे असतात ती त्यांना द्यावी लागतात असेही अजित पवार म्हणाले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *