Breaking News

सुषमा अंधारे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवसेनेचे शिवबंधन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. बंड केल्यानंतर खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाला दोन्ही गटाने शिवसेना पक्ष संघटेवरील आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे कायदेशीर लढाई सुरु असताना दुसरीकडे दोन्ही गटांमध्ये वेगवेगळे नेते प्रवेश करत आहेत. आज मुंबईत फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तथा प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले आहे. ठाकरेंनी ही घोषणा सर्वांसमोरच केली.

सुषमा अंधारे या फुले-शाहू आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध वक्त्या आहेत. त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी आपल्या सर्वांचा एकच संवैधानिक शत्रू असेल, तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. सुषमा अंधारे याआधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार केला होता.

शिवसेनेत काय जबाबदारी असेल. कोणतं लाभाचं पद असेल, असे मला विचारले जात आहे. पण माझ्या डोक्यावर ईडीच्या फाईलींचं ओझं नाही. किंवा अमित शाहा यांनी कोणतेही प्रलोभन दिलेले नाही. मी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून लौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिसैनिकाच्या घरातील बहीण लेक होण्याचा मी प्रयत्न करेन. हीच जागा सर्वात मोठी आहे, असे मला वाटत आहे. नीलम गोऱ्हे माझ्यासाठी कायम आदर्श राहिलेल्या आहेत. त्या माझ्यासाठी आईसारख्या आहेत असेही त्या म्हणाल्या.

तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने अनेक सामान्य माणसांना असामान्य केलं. जे लोक असामान्य झाले ते शिवसेनेतून निघून गेले. आता परत एकदा सामान्यातून असामन्य माणसं घडवण्याची वेळ आली आहे. सुषमा अंधारे यांचे मी मनापासून स्वागत करतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचे शिवसेनेत स्वागत गेले. तसेच उद्धव ठाकरे यांनी मी अंधारे यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोबवतो, असेही त्यांनी सर्वांसमोर जाहीर केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *