Breaking News

शिवसैनिकांवरील हल्ल्यावरून उध्दव ठाकरे म्हणाले, तर आम्ही शांत बसणार नाही… पोलिसांनी राजकारणात पडू नये

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी खरी शिवसेना कोणाची? यावरून रस्सीखेच सुरु असतानाच भायखळ्यातील शाखा क्रमांक २०८ चे शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भायखळा येथील शाखेला भेट दिली. त्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले की, जर जीवाचा खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला.

शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करत आहे. पण हे राजकारण आतापर्यंत कोणीच पाहिलेलं नाही, हे सुडाचं राजकारण आहे असा संताप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी व्यक्त केला. शिवसेनेचे पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी पोलिसांना सर्वासमोर जाब विचारला.

पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार यावेळी पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागणार नाही म्हटलं आहे, पण मग ते शिंदे सैनिक आणि उद्धव साहेबांचे सैनिक असा प्रश्नही त्यांनी विचारला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारत काही वेडवाकडं काही झालं तर तुम्ही जबाबदार असणार असं सांगितलं. तसंच जिवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही दिला. शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर तुम्ही जबाबदार असणार असंही हे ते पोलिसांना म्हणाले.

शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करत आहे. पण हे असं राजकारण आतापर्यंत कोणीच पाहिलेलं नाही. हे सुडाचं राजकारण आहे. संशयितांना संरक्षण का दिलं जात आहे? शोध किती काळ सुरु राहणार आहे? अशी विचारणाही त्यांनी पोलिसांना केली.

राज्यात आतापर्यंत अशा गोष्टी झाल्या नव्हत्या. हवं तर तुम्ही हात वर करा, शिवसैनिक आपलं रक्षण करण्यास समर्थ आहे. कारभार करणारे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जाऊन विचारा असं आवाहनच त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.

तसेच यावेळी पोलिसांनी राजकारणात पडू नये जे काही राजकारण करायचे ते आम्ही करू मात्र तुम्ही राजकारणा करू नका अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *