Breaking News

वडिलांच्या वक्तव्यावर संभाजी राजेंनी दिली “ही” प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले मी काही भाष्य करणार नाही

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी शिवसेनेशी सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला असा आरोप केला. तसेच आपण आता स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असल्याची घोषणा केली.

यावरून राज्यात भाजपाने शिवसेनेवर टीका सुरु केल्यानंतर या प्रकरणी दस्तुरखुद्द संभाजी राजे यांचे वडील श्रीमंत शाहु महाराज यांनीच भाष्य करत संभाजी राजे यांना कान पिचक्या दिल्या. आता वडीलांनीच कानपिचक्या दिल्यानंतर संभाजी राजे यांनी ट्विट करत आपली भावना व्यक्त करत प्रतिक्रिया व्यक्त केली.

श्रीमंतर शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संभाजीराजेंसोबत उमेदवारीसोबत विचारविनिमय झाला नसल्याचं स्पष्ट करतत्यांची व्यक्तिगतरित्या उमेदवारी नाकारली आहे.

आमच्यात काही विचारविनिमय झाला असता किंवा मी त्यांना संमती दिली असती किंवा नसती. काही झालं असतं. पण तसा काही विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही. हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर वेगळा विषय असता. पण तसं काही झालं नसल्याचे स्पष्ट केले.

राज्यसभेवर जाण्याचे जानेवारीपासून त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांची काय योजना होती याची काही कल्पना नव्हती. त्यावेळी देखील चर्चा नाही झाली.

पण तिकडे जात असल्याचा निर्णय त्यांनी मला सांगितला. त्याला मी विरोध केला होता पण लोकशाही असल्याने ते कुठेही जाऊ शकतात. ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा होता. पण ते फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असता तर म्हणता येईल की शब्द फिरवला. पण वाटाघाटी चालू असताना, ड्राफ्ट स्टेजमध्ये असल्याने नक्की काही ठरलेलंच नव्हतं असेही त्यांनी सांगितले.

श्रीमंत शाहु महाराजांनीच आता यावर भाष्य केल्याने पिता-पुत्रामध्ये राज्यसभेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा झाली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

वडीलांनी व्यक्त केलेल्या या माहितीवर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असे संभाजीराजे छत्रपती आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उमेदवारीबाबत दिलेला शब्द मोडल्याची टीका केली होती. तसेच, आता आपण राज्यसभा उमेदवारी लढवणार नसल्याचं देखील जाहीर केलं होतं.

संभाजीराजेंना पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेनेकडून कोल्हापुरातल्याच संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या घटनाक्रमावरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *