Breaking News

संजय राऊत पंतप्रधान मोदींना म्हणाले, जर त्यांचे जुनं नाते मग आमचं काय आहे? गोव्यात जर कोणाचा झेंडा तर तो शिवसेनेचाच

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा निवडणूकीच्या प्रचार सभेसाठी आल्यावर म्हणाले की, गोव्याशी माझं जुनं नातं आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले मग आमचं काय? तुमचं आहे आणि आमचं काय आहे? जर गोव्याशी जुनं नातं असेल तर ते शिवसेनेच असून महाराष्ट्राच आहे. तुम्ही गोव्याची भाषा, संस्कृती, आमच्या सगळ्यांचे देव गोव्यात आणखी काय नातं पाहिजे. अजून काय नात्याचं तुम्हाला प्रमाणपत्र आणून दाखवू. अर्धे गोवेकर मुंबईत आहेत आणि जे आहेत ते सगळे शिवसेनेत आहेत. त्यामुळे आम्हाला नाती-गोती सांगू नका असा सज्जड इशाराही त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला दिला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) गोव्यात शिवसेनेच्या प्रचार सभेत बोलत होते.

गोव्यात जर भगवा झेंडा कुठला फडकायचा असेल तर तो फक्त शिवसेनेचा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा असणार असल्याचे सांगत हा गोव्याचा बुलंद आवाज आहे की आता आम्हाला शिवसेना हवी आहे. जिथे जिथे आम्ही घराघरात जातोय, तिथे सांगतात की तुम्ही आधी का नाही आलात. आम्ही तुमची वाट पाहत होतो तुम्ही आधी का नाही आलात. आज आपण इथे आलेलो आहोत. गोव्यात शिवसेना नवीन नाही, आम्ही येतोय, लढतोय, काम करतोय पण यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठरवलं की आपण जोरदार लढाई करायची. गोव्यात विधानसभेत आमदार जातील आणि भविष्यात गोव्यावर शिवसेनेचं राज्य येईल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं पाहिजे असे आवाहनही तेथील शिवसैनिकांना त्यांनी केले.

परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता आम्ही ठरवलं आहे की गोव्यात जर भगवा झेंडा कुठला फडकायचा असेल तर तो फक्त शिवसेनेचा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा. म्हणून आज आम्ही सगळे इथे व्यासपीठावर आहोत. ज्यांचा ज्यांचा कोकण आणि गोव्याशी संबध आहे ते सगळे आज इथे आहेत, तुम्ही सर्वजण आहात. म्हणून माझं शिवसैनिकांना एकच सांगणं आहे की पुढील ७२ तास महत्वाचे आहेत असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

जर गोव्याशी कुणाचं जुनं नातं असेल तर ते शिवसेनेचं आहे आणि महाराष्ट्राचं आहे. तुम्ही गोव्याची भाषा, संस्कृती, आमच्या सगळ्यांचे देव गोव्यात आणखी काय नातं पाहिजे. अजून काय नात्याचं तुम्हाला प्रमाणपत्र आणून दाखवू. अर्धे गोवेकर मुंबईत आहेत आणि जे आहेत ते सगळे शिवसेनेत आहेत. त्यामुळे आम्हाला नाती-गोती सांगू नका. गोव्यातला जो मूळ पक्ष आहे त्या पक्षाचं नावचं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहे, हे नातं आहे आमचं आणि त्या पक्षाचे जे पहिले मुख्यमंत्री होते भाऊसाहेब बांदोडकर, त्यांची आणि बाळासाहेबांची जीवलग मैत्री होती. आम्ही शिवसेना इथे आलो नाही कारण बाळासाहेब आम्हाला सांगायचे, अरे भाऊसाहेबांचा पक्ष शिवसेनेचंच काम करतोय. ते हिंदुत्वाचा मराठी माणसाचा आवाज बुलंद करत आहेत, ते आपलच काम करत आहेत. आपल्याला जायची गरज नाही, हे आमचं बाळासाहेबांचं विशाल हृदय होते अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *