Breaking News

धर्माचा चष्मा लावणाऱ्यानों, गीता पठण स्पर्धेतही मुस्लिम मुलगी प्रथम आलेली होती देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही-नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी

देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला असून या आक्षेपाला नवाब मलिक यांनी आपल्या भाषेत उत्तर दिले.

शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र सोलापूर व इतर जिल्हयात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे याची आठवणही त्यांनी भाजपला करुन दिली.

दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. शिवाय मंदिरामध्ये सीनही केले आहेत याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केले आहे असे होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी मुस्लिम लीगचीच भाषा बोलताहेत

उद्धव ठाकरे, इंडी आघाडी सध्या मुस्लिम लीगचीच भाषा बोलत असून उद्धव ठाकरे, इंडी आघाडीला मत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *