Breaking News

मुंबईसह या जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला इशाराः मान्सूनपूर्व पावसाची हजेरी राज्यातील बहुतांष जिल्ह्यात तापमानात घट पण उखाडा नेहमीप्रमाणे

हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे राज्यात ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्याचं पाहायला मिळतं. काही जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांत तुफान पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये २४ तासांत ढगाळ आकाश असून संध्याकाळी किंवा रात्री हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनक्रुमे ३४ ते २८ अशं सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर आज ठाणे आणि पालघरमध्येही रिमझिम पाऊस होऊ शकतो. तर धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यावेळी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. येत्या ३ ते ४ तासात नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Check Also

आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *