Breaking News

Tag Archives: raj thackeray

शरद पवारांना राज ठाकरेंचे प्रतित्तुर म्हणाले, अर्थ समजावून सांगा पुण्यातील मुलाखतींचा संदर्भ देत पत्रकार परिषदेत दिले उत्तर

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातींचं राजकारण, त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढल्याचा जाहीर आरोप राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रबोधनकारांच साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. पवारांच्या त्या सल्ल्यावर राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो …

Read More »

पवारांचा मोदींना टोला, राज्यपालांना कान पिचक्या तर राजना आजोबांची पुस्तके वाचण्याचा सल्ला आकड्यात चूक दुरूस्त किंवा सुधारणा करायची राहीली असावी

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने १०० लाख कोटी रूपये पायाभूत सुविधांवर खर्च करणार असल्याचे सातत्याने सांगत आहेत. यंदाच्या लाल किल्ल्यावरील भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला. कदाचित त्यांना आकड्याच्या संख्येत झालेली चुक दुरूस्त करायचे किंवा सुधारणा करायचे राहीले असावे असा उपरोधिक टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

…जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा राज ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा उपरोधिक टोला

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. एका …

Read More »

भाजपा मनसेच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविणार ? चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोविडमुळे आणि राज्यातील सत्तांतरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा चांगलीच बदनाम झालेली असल्याने आगामी १३ महानगरपालिकेच्या निवडणूकां नजरेसमोर ठेवत भाजपाने नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून या रणनीतीचा भाग म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंज बंगल्यावर जावून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत राज्याचे …

Read More »

राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल, रेमडेसिविरचे वितरण केंद्राकडे घेण्याचे प्रयोजन काय? अविश्वास दाखविण्याऐवजी राज्यांकडे जबाबदारी सोपविण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना साथ रोगाशी लढण्याचे प्रमुख काम राज्यातील स्थानिक रूग्णालये, तेथील वैद्यकिय व्यवस्था राखणारे डॉक्टर, नर्सेस यांच्याकडून होत आहे. त्याचे नियोजन करण्याचा अनुभव त्यांचा जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बाधित रूग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर औषधाचे वितरण व्यवस्था स्वत:कडे अर्थात केंद्राने घेण्याचे काय प्रयोजन काय? असा सवाल मनसे प्रमुख राज …

Read More »

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र प्रसार रोखण्यासाठी केल्या पाच मागण्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येमुळे परिस्थिती बिकट बनत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वांरवार कडक निर्बंध लादणे कोणत्याही राज्याला परवडणारे नाही. तसेच  राज्यात १०० टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. आरोग्य हा राज्यांचा विषय असल्याने लसीकरण करण्यासाठी राज्याला लसींची खरेदी करण्यासाठी पुरेसे अधिकार दिल्यास राज्याला कोरोनाचा सामना करणे सोयीचे जाईल असे सांगत …

Read More »

परिक्षार्थींच्या मागणीनुसार रविवारची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांची विनंती आणि एमपीएससीची परिक्षा रद्द

मुंबई : प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परिक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आता परिक्षार्थींनीच परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे …

Read More »

राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं ? शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाणार तेलशुद्धीकरण  प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. नाणारमध्ये २२१ गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या …

Read More »

वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव

ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …

Read More »

२४ वर्षानंतर शिवउद्योग सेनेच्या मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमाला दिली करमाफी विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास मान्यता

मुंबई : प्रतिनिधी  साधारणत: २४ वर्षापूर्वी राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असताना नवतरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जगविख्यात पॉपसिंगर मायकेल जॅक्सन याच्या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला करमणूक कर भरावा लागला. मात्र तो भरलेला कर पुन्हा सदर कंपनीला परत देण्याचा निर्णय राज्य सरकारने …

Read More »