Breaking News

Tag Archives: covid-19

पंतप्रधान मोदीजी, डॉ.आंबेडकरांनी नाकारलेले शब्द वापरू नका प्रा.गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांचे मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपू्ण देशभरात शाररीक अंतर राखण्यासाठी आपण इंग्रजीतला social distancing हा शब्द प्रयोग वापरण्यास सुरुवात केली. मात्र हा शब्द पूर्वीच्या अस्पृश्यता पाळण्याच्या प्रथांची आठवण करून देतो. तसेच हा शब्द देशाचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेला शब्द आहे. तसेच who नेही या शब्दाला पर्यायी शब्द दिला आहे. …

Read More »

राज्यात कोरोनाचे नवे ३२८ नवीन रुग्ण एकूण रुग्ण संख्या ३६४८ वर तर ३६५रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात कोरोनाबाधीत ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात …

Read More »

कोरोनाची ६ ठिकाणी तपासणी केंद्रे : तर उपचारासाठी ५५ रूग्णालये अधिसूचित वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता, त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्या बाबत सुचित करण्यात आले होते. प्रत्येक …

Read More »

कोरोनाच्या डॉक्टर्स व आरोग्यसेवकांच्या काळजीपोटी राष्ट्रवादीचा पुढाकार संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या मास्कचे वाटप करणार असल्याची शरद पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णसेवेतील डॉक्टर्स व आरोग्यसेवकांसाठी संपूर्ण चेहरा झाकणारी सव्वा लाख सुरक्षा आवरणे तयार करून वितरित करण्याचे काम राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने हाती घेण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा …

Read More »

राज्याच्या तिजोरीत ३८ हजार कोटी आणण्यासाठी जीएसटी लागली कामाला अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना ईमेल, फोन, एसएमएसद्वारे विनंती

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील जवळपास सर्वच व्यवसाय, व्यावसायिक संस्था बंद आहेत. मात्र लॉकडाऊन लागू करण्याच्या कालावधीत व्यापाऱ्यांनी ३८ हजार कोटी रूपयांचा परतावा भरला नाही. त्यामुळे ही परताव्याची रक्कम राज्याच्या तिजोरीत आणण्यासाठी जीएसटी भवनचे अर्थात जून्या विक्री विभागाचे अधिकारी घरी असूनही कामाला लागल्याची माहिती जीएसटी …

Read More »

सूट दिली असली तरी सार्वजनिक वाहतूक आणि सणावर बंदी कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना …

Read More »

कोणताही गाजावाजा न करता विद्यार्थी- प्राध्यापकांकडून मदतकार्य खरे-ढेरे भोसले महाविद्यालयातल्यांचा उपक्रम

गुहागर: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरजूंना, कामगारांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, राजकिय पक्षाचे नेते पुढे आलेत. मात्र कोणत्याही प्रसिध्दीचा किंवा साधी आठवण म्हणूनही स्वत:च्या कार्याची कुठचीही नोंद न ठेवता गुहागर तालुक्यातील गरजूंना, गरीब कामगारांना घरपोच वैद्यकीय आणि अन्नधान्याची मदत करण्याचे महत्वपूर्ण कार्य विद्यार्थी आणि प्राध्यांपकांकडून करण्यात येत …

Read More »

फक्त नोंदणीकृत १२ लाख बांधकाम कामगारांना २ हजाराची मदत राज्याच्या कामगार विभागाला आली उशीरा जाग

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील भूमिपूत्र असलेला बांधकाम कामगारावर बेरोजगार होवून भीकेची आणि उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अखेर या बांधकाम कामगार मात्र नोंदणीकृत असलेल्यांना प्रत्येकी २ हजार रूपये देण्याचा निर्णय नुकताच कामगार विभागाने घेतल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री …

Read More »

कापूस खरेदीला सोमवारपासून सुरूवात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

सातारा : प्रतिनिधी लॉडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा माल वाया जावू नये यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडील कापसाची खरेदी राज्य सरकार कडून करण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रांमध्ये या कापसाच्या खरेदीला सोमवार २० एप्रिलपासून सुरुवात केली जाणार असल्याची …

Read More »

आरोग्य, पोलिस, होमगार्ड यांच्यासह अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयाची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. तर आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, होमगार्ड व इतर विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन-मानधन तात्काळ अदा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ …

Read More »