Breaking News

Tag Archives: aditya thackeray

१ फेब्रु.पासून या वेळेतच सर्वांना लोकल प्रवास करता येणार कार्यालयीन वेळा बदलण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकलने प्रवास करण्याच्या वेळा निर्धारीत करण्यात आल्या असून तीन टप्प्यात …

Read More »

सिरमची लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी केल्यानंतर माहिती

पुणे : प्रतिनिधी सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. …

Read More »

खारफुटीच्या संरक्षणासाठी कारवाईचे अधिकार वन विभागाला द्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास, सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार राज्य शासनाच्या वन विभागालाही देण्यात यावेत, अशी मागणी राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्री प्रकाश जावडेकर …

Read More »

आता आमदार किंवा ओळख नसली तरी विधानमंडळ बघता येणार जनता आणि पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला. यासंदर्भात विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. …

Read More »

आजचा दिवस क्रांतीकारक पण कोविड सेंटर असेच ओस राहो मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत आजही ते …

Read More »

देशातील पहिल्या समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा मुंबईत शुमारंभ 'मावळा' टीबीएम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा …

Read More »

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला राज्यातील ‘आयटीआय’च्या अद्ययावतीकरणातून ‘जागतिक दर्जाच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी जागतिक औद्योगिक क्षेत्राची गरज भागवू शकतील असे कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रातून उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारण अकरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार …

Read More »

…आणि मंत्रालयात बालनाट्य सुरु भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी बाल रंगभूमीवर बालनाट्य बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात “होय! मेट्रोचा खेळ खंडोबा करुन दाखवला!!” नावाचे सुरु असलेले बालनाट्य मुंबईकर हताशपणे पाहत आहेत, अशा शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवर मेट्रो कारशेडच्या विषयावरून टीका केली. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला चपराक लावली आहे …

Read More »

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना तर मागवाच  तसेच जागतिक स्तरावरील  सल्लागार देखील नियुक्त करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. वर्षा येथील समिती सभागृहात यासंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.जलसंपदा …

Read More »

राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काढले यांनी काढत डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे …

Read More »