Breaking News

Tag Archives: aditya thackeray

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करा गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. …

Read More »

मुंबईत राहणार नाईट कर्फ्यू महानगरपालिकेकडून ट्विटद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात रात्रीची जमाव बंदी आदेश उद्यापासून रविवारपासून लागू होत आहे. मात्र मुंबईत आज ६ हजारहून अधिक रूग्ण आढळून आल्याने मुंबईतही जमावबंदीबरोबरच नाईट कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने ट्विटरवरून दिली. तसेच रात्रो ८ ते सकाळी ७ वाजेपर्यत सर्व मॉल बंद राहणार असून तशी कल्पना सदर आस्थापनांना …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार होम क्वारंटाईन ? वर्षावर मुक्काम मंत्री आदित्य ठाकरे संपर्कात आल्याने निर्णय

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे एकच खळबळ माजली असतानाच मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आदित्यच्या संपर्कात आल्याने पुढील ८ ते १० दिवस होम क्वारंटाईन होणार असून हा संपूर्ण कालावधी मुख्यमंत्री वर्षा या शासकिय निवासस्थानी राहणार …

Read More »

वरळीच्या दूध डेअरीच्या जागेवर आता पर्यटन विभागाची टोलेजंग इमारत ? वापर होत नसलेली जागा राज्य सरकारला परत करा

मुंबईः विशेष प्रतिनिधी वरळी येथील तब्बल २५ एकर जागेवर राज्य सरकारच्या मालकीची दूध डेअरी सुरु करण्यात आली. परंतु ही दूध डेअरीकडून पूर्वीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात दूध व्यवसाय करत आहे. त्यामुळे सदरची जमिन राज्य सरकारला परत करावी या अनुषंगाचे पत्र नुकतेच महसूल विभागाने वरळी येथील शासकिय दूध डेअरीला लिहिले असून …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंची स्पष्टोक्ती, लॉकडाऊनबाबत दोन दिवसात निर्णय मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या आधीच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होवू लागल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा कि नाही याचा निर्णय राज्यातील जनतेवर सोडला. परंतु, मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आणि पुणे विभागात सातत्याने बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिथे …

Read More »

मंत्रालयातून इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय? असा सवाल करीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच आज सभागृहात उघड केले. विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना भाजपा …

Read More »

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक

मुंबई: प्रतिनिधी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर आता राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या शिवसेनेच्या संभावित आमदार तथा चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची वर्णी आता शासनाच्या एका समितीवर समन्वयक म्हणून नुकतीच करण्यात आली. तसेच यासंबधीचे आदेशही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाच्या मार्फत काढले असून त्याची माहितीही …

Read More »

“निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकारची अकार्यक्षमता” आ. अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जीएसटीचे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२०-२१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली या गोष्टी गरज तर आदित्यनी सांगितले उभारणार वांद्रे उड्डाणपुल मार्गिकेच्या उद्घाटन प्रसंगी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सुनियोजितपणे तसेच पर्यावरणाचे जतन करत करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत मुंबईत आजही सायकल चालविली जात असल्याने स्वतंत्र ट्रॅक असण्याची गरज असल्याचे भूमिका मांडली. त्यावर मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी पदपथाबरोबर सायकल ट्रॅक उभारणार असल्याचे सांगत वडिल मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

कोरोना चाचणी करायचीय? थांबा आता फिरती चाचणी गाडी येतेय संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा- मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध  करून  देण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त  ३ हजार …

Read More »