Breaking News

Tag Archives: देवेंद्र फडणवीस

प्रविण दरेकर यांनी दिला खोचक सल्ला, संजय शिरसाटांनी क्षमतेत बोलावे संजय शिरसाट यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे विधानावरून सल्ला

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चांगलेच कान टोचले आहेत. संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे, असा सल्ला दरेकर यांनी दिला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज वक्तव्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात चांगले काम …

Read More »

लोक उपचाराअभावी मरत असताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा कसल्या करता? प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाची आढावा बैठक नवी मुंबईत संपन्न

काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक स्तरावर, मंडल स्तरावर व ग्राम स्तरावर पक्षाची संघटनात्मक बांधणी किती झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी विभागीय बैठका घेतल्या जात आहेत, अशी माहिती …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा नाराज? मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजरीवरून पुन्हा तर्कवितर्कांना उधाण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर नसल्याने ते कमालीचे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र अनुपस्थितीबाबत त्यांच्या कार्यालयाकडून काहीही माहिती देण्यात आली नाही. पण दबक्या आवाजात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु आहे तर नाराजी बाबतची अनेक कारणे समोर …

Read More »

डॉ आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३ सह चार नव्या चार ग्रंथाचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित

डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (भाग १ व २) या नवीन ग्रंथांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या प्रकाशन प्रसंगी उच्च व तंत्र …

Read More »

गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

शिवछत्रपती यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाची बैठक इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

इतर मागास समाजाच्या अर्थात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणूकीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात गणरायाला निरोप

अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे …

Read More »

डॉ स्वामीनाथन यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या शब्दात वाहिली आदरांजली स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला

‘भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचं सोंग राजकिय नेतृत्वामुळे नागपूरकरांना पूरपरिस्थितीला सामोरे जावं लागलं

आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचा सोंग घेऊन नागपूरच सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूर परिस्थितीत ढकलून देण्याच पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केलं, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. अंबादास दानवे यांनी आज नागपूर येथे आलेल्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा …

Read More »

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन …

Read More »