Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी

मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, …समुपदेशन शिबिरं मोलाची भूमिका बजावतील युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय

“जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरं नक्कीच मोलाची भूमिका बजावतील”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

छत्रपती संभाजी नगर नव्हे तर आता औरंगाबादच, उच्च न्यायालयाचा आदेश जिल्हाधिकाऱ्याकडूनही आदेश जारी

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्वत्र संभाजीनगर उल्लेख होत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्ह्याचा उल्लेख आधीप्रमाणे औरंगाबादच करण्याचे निर्देश दिले. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तसे आदेशही दिले. मात्र, जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगरच होत असल्याने आता इनामदार सय्यद …

Read More »

पुणे मेट्रोच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीचा वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी…. जलयुक्त शिवार, कृषी सिंचन योजनांचा आढावा बैठकीत दिले आदेश

अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या जवळची माणसे म्हणतात, कधी कोणती भूमिका घ्यायची याचे भानच नाही मुख्यमंत्र्यांच्या अवती-भवतीच्या व्यक्तीकडूनच सुरु झालेल्या चर्चेला उधाण

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाश शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपाचे (BJP) नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानापन्न होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आले. मात्र तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना अद्याप कोणत्या राजकिय परिस्थितीत (Political Situation) काय निर्णय …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ अन्य महत्वाचे निर्णय कंत्राटी निदेशकांचे मानधन, नवे पशू वैद्यकीय महाविद्यालय, उद्योग धोरणांना मुदतवाढ

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आयआयटीच्या कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारणीला मंजूरीही देण्यात आली आहे. तसेच या महाविद्यालयातील १०४ पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योग विभागाकडून इलेट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णयही …

Read More »

नाना पटोले यांची टीका, परमवीर सिंहांनी केलेल्या मदतीची शिंदे फडणवीसांनी केली…. फडणवीसांनी परमवीर सिंहाच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली

अँटिलिया स्फोटकाचा कट रचून तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आता उघडे पडले असून परमवीर सिंह हे फडणवीसांच्या हातचे बाहुले होते हे स्पष्ट झाले आहे. परमवीर सिंहानी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिंदे फडणवीस सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता …

Read More »

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मान्यता

मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास ५५ ते ६० वर्षे कालावधी लोटला आहे. बहुतांश इमारती मोडकळीस आलेल्या असून त्या धोकादायक …

Read More »

अकोला, शेवगाव दंगलप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले पोलिस महासंचालकांना ‘हे’ आदेश सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलीनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता …

Read More »