Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या जवळची माणसे म्हणतात, कधी कोणती भूमिका घ्यायची याचे भानच नाही मुख्यमंत्र्यांच्या अवती-भवतीच्या व्यक्तीकडूनच सुरु झालेल्या चर्चेला उधाण

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाश शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपाचे (BJP) नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानापन्न होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आले. मात्र तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना अद्याप कोणत्या राजकिय परिस्थितीत (Political Situation) काय निर्णय घ्यायचा आणि कोणती भूमिका घ्यायची याचे भान आले नसल्याची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दही-हंडी, होळी, गणेशोस्तव, नवरात्रोत्सव आदी सण-उत्सव नजरेसमोर ठेवत निर्बंध मुक्त सण साजरे करण्याची घोषणा केली. होळी (Holi)  सणाच्या दिवशी सकाळीच पश्चिम महाराष्ट्रातील, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले. तसेच अनेक शेतकऱ्यांची (Farmers) हातची पिके गेल्याने अनेक शेतकऱ्यांकडून धाय मोकलून रडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तसेच शेतकऱ्यांच्या भावविश्व लघडून दाखवणारे व्हिडिओही मोठ्या प्रमाणवर व्हायरल झाले. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठा संयम दाखवित किमान होळी खेळत असताना शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि पुन्हा होळी उत्सवात मग्न होणे अपेक्षित नव्हते.  परंतु मुख्यमंत्री आपल्या कुटुंबियांच्या आणि पाठिराख्यांच्या सोबतीने ठाणे येथील आपल्या खाजगी निवासस्थानी होळीचा सण साजरा (Holi Celebration)  करण्यात गुंग झाले. विशेष म्हणजे होळीच्या दिवशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी शेतकऱ्यांच्या नुकसानासंदर्भात विचारले तर दोन-तीन दिवसात मदतीची घोषणा करणार असल्याचे जाहिर करत राज्याच्या मुख्य सचिवांना परिस्थितीची माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगत आपला त्या घटनेशी संबधच नसल्यासारखे दाखवून दिले.

त्यानंतर महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कारच्या वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Shinde) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे उपस्थित राहिले होते. त्यावेळी उष्माघातांच्या लाटेमुळे २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. वास्तविक पाहता देशातील किंवा राज्यातील कोणताही नेता भर उन्हात ते ही उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाही लाखो लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे धाडस करत नाही. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित करत २२ लाख लोक उपस्थित कसे राहतील याचे नियोजनही केले. तसेच एका दिवसासाठी राज्य सरकारकडून १४ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. तरीही उपस्थितीत नागरिकांपैकी २० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक होते. मात्र विरोधकांनी हल्लाबोल करताच राज्य सरकारने नाममात्र समिती स्थापन करत भविष्यात अशा कार्यक्रमाच्यावेळी कोणती काळजी घ्यायची याचा सल्ला ही समिती देणार असल्याचे जाहिर केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सावली सारख्या असणाऱ्या अधिकाऱी-कार्यकर्त्यांनी सांगितले.

त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) गटाने ज्या ज्या ठिकाणी जाहिर सभा घेतली त्या त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्यावतीने जाहिर सभांचे आयोजन करत प्रत्तुतर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला. परंतु या संदर्भात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांचे मित्र तथा मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहिररित्या केलेल्या सूचनेनंतर एकनाथ शिंदे यांनी संबधित ठिकाणी उत्तर सभा घेण्याचा निर्णय रद्द केल्याचेही सांगितले.

यापाठोपाठ कोकणातील प्रस्तावित ऑईल रिफायनरी (Oil Refinery)  प्रकल्पास स्थानिक पातळीवर अनेकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत आले. वास्तविक पाहता एखाद्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होत असेल तर राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पदी असलेल्या व्यक्तीकडून पुढाकार घेत तातडीने मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र विद्यमान आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याऐवजी ती जबाबदारी त्या भागातील स्थानिक मंत्री तथा राज्याच्या उद्योग मंत्र्यांवर सोपविली. स्व. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे मुख्यमंत्री असताना राज्यात अशी जर एखादी घटना होत असेल तर ते तात्काळ स्वतःचे सर्व शासकिय-राजकिय किंवा वैयक्तिक कार्यक्रम रद्द करून आंदोलकांशी चर्चा करत आणि राज्य सरकारची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न करत. मात्र आमचे मुख्यमंत्री नागरिकांनी इतका मोठा रोष व्यक्त करूनही नागरिकांशी चर्चा करायचे तर सोडा पण त्यावर चकार शब्दही काढला नाही. शिवाय त्याच दिवशी संध्याकाळी एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहायला पाहिजे नव्हते, तरी ते त्या दिवशी संध्याकाळी त्या कार्यक्रमाला हजर राहिलेच असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, काँग्रेसची राज्यात सत्ता होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकारही राज्यात होते. परंतु या दोघांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते किंवा पंतप्रधान, गृहमंत्री जर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असतील तर त्यांच्या प्रत्येक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री म्हणून ते कधीही जातीने हजर रहात नव्हते. तसेच महाराष्ट्राचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळत. मात्र आमचे मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री आले असतील यांच्या प्रत्येक दौऱ्याच्यावेळी स्वागताला हजर असतात. तसेच हे दोघांपैकी कोणीही एकजण आले की, राज्यात जणू जनतेचे प्रश्न संपले की काय या अर्विभात ते त्यांच्या सोबत दिवसभर राहतात अशी आठवणही करूनही दिली.

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होऊन वर्ष होत आले. नुकतेच सातारा जिल्ह्यात एक मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला त्यांचेच समर्थक असलेले मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुर्तर्फा जेसीबी (JCB) सारख्या मशिन्स उभ्या ठेवून त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर फुलं उधळायला लावली. त्यांच्या या कृत्यावर प्रसारमाध्यांतून टीकाही झाली. मात्र असे प्रसंग टाळण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रयत्न करायला हवे होते. मात्र ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाच्या इतर मंत्र्य़ांना कोणतेही भान आणि सामाजिक-राजकिय जाणीव नसल्यासारखे वागत असून भंपक प्रसिध्दीच्या मागे धावत असल्याची टीका केली.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या अनेक व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले त्या प्रत्येकाला ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेवर वर्णी लावत आहेत. तसेच मुख्यमंत्री पदाचा मान जातोय की स्वतःचा मान सन्मान जातोय याचे कोणतेच भान रहात नसल्याचे दिसून येत असल्याने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था बादशहा अकबरांच्या गोष्टीतील अकबर यांच्यासारखी झाली असल्याची खंत अन्य एका त्यांच्या सानिध्यातील अधिकाऱ्याने व्यक्त केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अखेर भारताने युनोत केले इस्त्रायलच्या विरोधात मतदान

इस्त्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत हमासला नेस्तानाभूत करायचे म्हणून पॅलिस्टीनी नागरिकांवर हल्ले करत त्यांना हुसकावून लावत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *