मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, परदेशातील गोळीबारावर बोलायला वेळ, पण मणिपूरवर नाही भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का ?
मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला …
Read More »मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ११ बुथवर पुन्हा मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे आयोगाला पत्र
भारताच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी अंतर्गत मणिपूरमधील पाच विधानसभा क्षेत्रांमधील ११ बूथवर घेतलेले मतदान रद्द घोषित केले आहे, पीठासीन अधिकाऱ्यांनी काही बूथमध्ये जमावाने हिंसाचार, गोळीबार आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नष्ट केल्याचा अहवाल दिला आहे. ईसीआयने जाहीर केले आहे की या बूथवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत फेरमतदान घेण्यात येईल. …
Read More »भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात
मणिपूरमधील भाजपा सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला वॉर मेमोरियल येथेून यात्रेच्या शुमारंभास परवानगी नाकारल्यानंतर मणिपूरमधून तौंबल (Thoubal) या ठिकाणावरुन यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारताचा तिरंगा ध्वज राहुल गांधी यांच्या हाती देत १५ राज्यातून ६७०० किलोमीटर वाहणाऱ्या भारत जोडो …
Read More »राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारली
देशातील हिंदूत्ववादी राजकारणामुळे धार्मिक राजकारणाला मोठे बळ मिळत देश दोन धर्माच्या विचारधारेत विभागत असल्याच्या काही घटना घडल्या. त्यानंतर राजकिय विचारधारेबरोबरच सामाजिक दुभंगलेपण देशात निर्माण होत असल्याची चर्चा सातत्याने विविधस्तरावर सुरु झाली. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकिय हेतूशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही सामाजिक संघटनांनी देशात निर्माण झालेले दुभंगलेपण कमी करण्याच्या …
Read More »विरोधकांच्या बहिष्कारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरवर भाष्य दोन तास झाले तरी पंतप्रधान मोदी काही बोलेना
मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला. या अविश्वास प्रस्तावारील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. मात्र देशातील इंडिया या विरोधकांच्या आघाडीतील सदस्यांनी दोन झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या विषयावर काहीच बोलेना म्हणून दोन तासानंतर लोकसभेतून मोदी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे मोदी यांचे विरोधकांच्या …
Read More »राहुल गांधी यांचा मोदींसह भाजपावर निशाणा; भारताचे तुकडे करताय, मणिपूरमधील आईला मारलत… अविश्वास ठरावावरून राहुल गांधी यांची मोदी यांना रावणची उपमा
मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या कमी व्हायला तयार नाही. या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे विरोधकांनी याप्रश्नावर चर्चेची मागणी करत सत्ताधारी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव संसदेच्या लोकसभेत आणला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ताशेरे ओढत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या …
Read More »संभाजी भिडे व मणिपूर हिंसाचाराविरोधात चेंबूरमध्ये भीम आर्मीची आक्रोश रॅली विविध संघटनांचा सहभाग
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसह मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भीम आर्मी या संघटनेने उद्या गुरुवारी (३ ऑगस्ट )चेंबूर येथे दुपारी ४ वाजता आक्रोश रॅलीचे आयोजन केले आहे या रॅलीत ख्रिस्ती संघटनांसह विविध महिला व सामाजिक संघटनांचाही सहभाग असणार आहे . महात्मा ज्योतिबा फुले …
Read More »काँग्रेसने दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरविल्याची जाहिरात मणिपूर प्रश्नी कोणी प्रश्न विचारू नये
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन पाच ते सहा दिवस झाले आहेत. या कालावधीत काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकिय विरोधी पक्षांकडून मणिपूर मधील हिंसाचार प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं अशी मागणी करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीतच चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र मणिपूरसह इतर काँग्रेस शासित राज्यात महिलांवर …
Read More »मणिपूर प्रश्नी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय !
मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …
Read More »