Breaking News

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारली

देशातील हिंदूत्ववादी राजकारणामुळे धार्मिक राजकारणाला मोठे बळ मिळत देश दोन धर्माच्या विचारधारेत विभागत असल्याच्या काही घटना घडल्या. त्यानंतर राजकिय विचारधारेबरोबरच सामाजिक दुभंगलेपण देशात निर्माण होत असल्याची चर्चा सातत्याने विविधस्तरावर सुरु झाली. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकिय हेतूशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही सामाजिक संघटनांनी देशात निर्माण झालेले दुभंगलेपण कमी करण्याच्या उद्देशाने कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळल्यानंतर आता भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा १४ जानेवारी २०२४ पासून मणिपूर येथून सुरु होणार आहे. मात्र या यात्रेची सुरवात मणिपूर येथून सुरु करण्यास मणिपूर राज्यातील भाजपा सरकारने परवानगी नाकारली असल्याची धक्कादायक माहिती काँग्रेस सरचिटणीस के सी वेगणूगोपाल यांनी दिली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला राज्याचा आगामी लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेचा आणि निवडणूकीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ नये. या उद्देशाने भारत जोडो न्याय यात्रेचा अंतिम मार्गक्रमणाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार ही यात्रा मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ येथून १४ जानेवारी २०२४ रोजी सुरुवात होऊन २० मार्च २०२४ या यात्रेचा मुंबईत समारोप करण्याचे नियोजन काँग्रेसने केले. ही यात्रा ज्या ज्या राज्यातून जाणार आहे. त्या राज्य सरकारकडे परवानगी मागितली असता संबधित मणिपूर मधील भाजपाप्रणित विरेंद्र सिंग सरकारने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेच्या शुमारंभास आक्षेप घेत इफाळ येथील पॅलेस परिसरात फक्त तिरंगा झेंडा उभारण्यास परवानगी दिली. मात्र तेथून पुढे यात्रा काढण्यास परवानगी नाकारण्यात येणार असल्याचे आपल्या आदेशात म्हटले.

मणिपूर सरकारकडून भारत जोडो न्याय यात्रेबाबतचे पत्र जारी केल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देत म्हणाले की, आज सकाळी आम्हाला मणिपूर सरकारचे पत्र मिळाले. त्यामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी नाकारण्यात आल्याची लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. मणिपूर सरकारचे ते पत्र वाचताच आपणास एकप्रकारे धक्काच बसला असल्याचे सांगत इंफाळ येथून यात्रेचा प्रारंभ करण्यास परवानगी नाकारत फक्त पॅलेज मैदानावर राष्ट्रध्वज फडकाविण्यास मणिपूर सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे यात्रेच्या शुमारंभासाठी आम्ही पर्यायी जागेचा शोध सुरु केला असल्याचेही सांगितले.

तसेच के सी वेणूगोपाल म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा शुमारंभ मणिपूर येथून करण्यामागे एक हेतू आहे. या यात्रेच्या निमित्ताने मागील काही महिन्यापासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे येथील जनतेत निर्माण झालेली मानसिक कटूता कमी करून त्यांच्यातील माणूसपणावरील प्रेम निर्माण होऊन शांतता स्थापित करण्याच्या उद्देशाने ही यात्रा सुरु करण्यात येणार होती. त्या दृष्टीनेच इंफाळ येथील हात्ता कैगजेबंग येथून यात्रेच्या प्रारंभासाठी परवानगी मागितली.

दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या काही भागात, नागालँड, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, आसाम आदी राज्यातून मार्गक्रमण करत पश्चिम बंगालहून बिहार, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात मधून मुंबई आणि महाराष्ट्रात या यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या शुमारंभाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे झेंडा दाखविणार आहेत. तसेच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पदाधिकारी ही यात्रेत सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *