Breaking News

Tag Archives: पोलिस लाठीचार्ज

संजय राऊत यांची खोचक टीका, राज्यात तीन जनरल डायर मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या हल्यावरून संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर टीकास्त्र

जालन्यातील अंबड तालुक्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात अनेक निष्पाप नागरिक गंभीररित्या जखमी झाले. मात्र त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर ठिकाणी भेट देण्याचे सोडा तेथील घटनेची माहिती घेण्याचेही टाळले. त्यातच पोलिसांना मुंबईतून फोन …

Read More »

मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी; त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागणी

मराठा आंदोलनाच्या वेळी जालना येथे जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी आहे, याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होत्या. मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशीलपणे हाताळला जावा. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप,…. पण, भाजपाची इच्छाशक्तीच नाही! मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य!

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही नवीन नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व मार्ग बंद झालेत काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आरक्षण देण्याचे सर्वच मार्ग बंद झालेले नाहीत. सत्ताधारी …

Read More »

‘शासन आपल्या दारी’साठी मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आरोप

येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनावरील लाठीमार प्रकरणी आज दुपारी मुंबईत प्रतिक्रिया देताना ते बोलत …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा घणाघात, सरकार कोण तर एक फुल दोन हाफ… जालना येथील आंदोलकांवरील हल्ल्यावरून सोडले टीकास्त्र

इस्रोच्या शास्त्रज्ञांचे पुन्हा अभिनंदन, आता सूर्याचा अभ्यास सुरु झाला गेली सहा दशके ही संस्था काम करते आहे. त्याचा आपल्याला अभिमान. काल मिर्लेकरांनी एक मेसेज पाठवला पक्ष चोरला चिन्ह चोरले पण ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करुन दाखवला. या तुमच्या शक्तीमुळेच आपल्याला हुकूमशाही विरोधी आघाडीत मानाचे स्थान. आम्ही व्यक्ती विरोधात नाही. आता …

Read More »

राज ठाकरे म्हणाले,… सरकारचं चुकलं मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्ज आंदोलन

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करत आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, ह्या घटनेवर मी …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी… दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत

“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, फोन आल्यानंतरच लाठीचार्ज, गोवारी हत्याकांड…. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच जालना येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. यावेळी भेटीनंतर आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यानंतर आयोजित …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, …३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा भाजपा श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून सर्वांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडणार...

आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जे सरकार स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलते त्या सरकारकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज होतो हे कितपत योग्य …

Read More »

माऊलींच्या दिंडीला गालबोट; पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज काही काळ वातावरण तणावाचे झाले

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार होते. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले. वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक …

Read More »