Breaking News

उद्धव ठाकरे यांचा घणाघात, सरकार कोण तर एक फुल दोन हाफ… जालना येथील आंदोलकांवरील हल्ल्यावरून सोडले टीकास्त्र

इस्रोच्या शास्त्रज्ञांचे पुन्हा अभिनंदन, आता सूर्याचा अभ्यास सुरु झाला गेली सहा दशके ही संस्था काम करते आहे. त्याचा आपल्याला अभिमान. काल मिर्लेकरांनी एक मेसेज पाठवला पक्ष चोरला चिन्ह चोरले पण ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करुन दाखवला. या तुमच्या शक्तीमुळेच आपल्याला हुकूमशाही विरोधी आघाडीत मानाचे स्थान. आम्ही व्यक्ती विरोधात नाही. आता जे टीका करतायत ते इंडिया विरोधी. आज संध्याकाळी जालन्याला जातोय. काल शासकीय अत्याचार झाला. नुसता निषेध व्यक्त करुन होणार नाही. सरकार कोण तर एक फुल दोन हाफ अशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, लोक उपोषणाला बसले होते. आपली इंडियाची बैठक सुरु होती त्यावर पत्रकार परिषद घ्यायला वेळ आहे पण आंदोलनकर्ते बसले तिकडे कुणालाच मंत्र्यांना वेळ नाही. एक फुल दोन हाफला माहिती नव्हती उपोषण सुरु आहे. बारसुला, वारकरी, काल मराठा समाजाच्या आंदोलनात अत्याचार झाला. तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागूच शकत नाही. सरकार आपल्या दारी थापा मारतय लय भारी हा कार्यक्रम त्यांना तिकडे घ्यायचा होता पण आंदोलनकर्ते म्हणाले कुणाला आमच्याशी बोलायला येऊ द्या. आता सरकार म्हणतय चौकशी करु दोषींना सोडणार नाही असेही सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे कायद्यासमोर समान असतील तो समान नागरी कायदा. गणपती येताहेत तेव्हा विशेष अधिवेशन बोलावलय. मुहूर्त काढणारे ज्योतिषी आणले कुठून. उत्सवाच्या काळात का अधिवेशन. मणिपूर बाबत तुम्ही अगदी थोड बोललात. पितृपक्षात घ्या ना. अधिवेशन घेताय मी स्वागत करतो पण, तुम्ही विशेष अधिवेशनात मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी सगळ्यांना वटहुकूम काढून आरक्षण द्या अशी मागणीही केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, महागाई वाढलेली या परिस्थितीत लाठीमार करताय, घरात घुसणार पोलीस आणि आम्ही तुमच्या दारी. हीच हुकूमशाही चिरडण्यासाठी आम्ही इंडिया म्हणून एकत्र. मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही. जी लोक कुटुंब व्यवस्था नाकारतात त्यांनी आमच्या बद्दल बोलू नये. अगोदर स्वतःचे कुटुंब सांभाळा. २०१२/१३ सालची गणपतीच्या दिवशी बंद करायचे म्हणून सुषमा स्वराजांच्या फोनची आठवण. बाळासाहेबांची आठवण. तेव्हा गणपतीत सिलेंडर विरोधात आंदोलन तेव्हा ३५० रुपयाचा सिलेंडर आता १२००/ पर्यंत गेला आणि २००/ ने कमी केला अशी खोचक टीकाही केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, डिसेंबर महिन्यात खासगी विमाने हेलिकॉप्टर आरक्षित केलेली आहेत. आज महाराष्ट्र तापलेला आहे, जमिनीची मशागत करण्याची आज ही वेळ आहे. चाय पे चर्चा २०१४ साली झाली आता आपल्याला होऊन जाऊदे चर्चा सुरु करायची आहे. लोकांच्या मनात जे रुजलय त्याला धुमारे द्यायचे आहे. कर्नाटकात भाजपचा भ्रष्टाचार लोकांपर्यंत पोहचला होता तोच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात आपल्याला राज्यात पोचवायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांध्यावर जा, महिलांना विचारा, खात्यात पीएम किसान सन्मान योजनेबाबत विचारा चर्चा करा. पंतप्रधान आवास योजना बाबतचा शोध पत्रकारीतेतली एक बातमीचा किस्सा. ही पंतप्रधान आभास योजना आहे. पुण्यप्रसून वाजपेयींनी उघड केलेल्या घटनेचा संदर्भ. उद्या तुम्हाला म्हणतील चंद्रावर सगळ्यांना घरे देईल. सगळे जुमले अच्छे दिन येणार होते पण आता शेतातले घर गहाण ठेवावे लागते आहे ही वस्तुस्थिती आहे. गॅस सिलेंडर स्वस्त पण भाज्या, डाळी किती महाग केला. यातून साध्य नाही होत तर दंगली पेटवायच्या असा आरोपही केला.

उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधताना म्हणाले, तुमच्या कर्तृत्वाने निवडणुका जिंकता येत नाही. भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजपा आमच्यातले भाडखाऊ तुम्ही घेऊन गेलात. शिवसेना निष्ठेवर चालणारा पक्ष. आपल्याकडे भरपूर पर्याय आहे. पण त्यांच्याकडे एकच तो पण कमी पडायला लागलाय. चले जाव मध्ये भाजप नव्हताच, यांची मातृसंस्था होती का? श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगाल फाळणीला पाठिंबा दिला होता, चले जाव आंदोलनाला पत्र लिहून विरोध केल्याचे प्रकाशित. मला माँ आणि बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा अभिमान. भाजपाची पालखी वाहायला बाळासाहेबांनी सांगितले नव्हते. हिंदूंची मक्तेदारी भाजपाकडे नाही ती तमाम हिंदूंकडे आहे. बिल्कीस बानो कडून राखी बांधा असे मी आवाहन केले होते असे सांगत नरेंद्र मोदी आणि भाजपावर शरसंधान केले.

जालन्यातील घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काल लाठीमार केला त्यात ज्या भगिनी होत्या त्यांचेकडून राखी बांधून घ्या. कोरोना काळात जिवावर उदार होऊन पोलीस, सफाई कर्मचारी सगळेच जीव वाचवत होते ते पोलीस असे जीवावर उठणार नाही त्यामागे कोण आहे. मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले पण शांतेत झाले. उपने म्हटले होते मी दिलेले आरक्षण टिकेल मग का आरक्षण मिळत नाहीए असा सवालही केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र खेरीज फिल्ड हॉस्पीटल कुठल्या राज्याने उभारले? सहाशेच्यावर चाचणी केंद्र आपण नेली. तुम्ही थाळ्या वाजवा दिवे लावा सारखे उद्योग सुरु होते. आपण एक रक्कमी चेक देऊन लस खरेदी करणार होतो. मग केंद्र म्हणाले कोटा मिळेल. सगळी थापेबाजी. कॅगचा सध्याचा अहवाल अनेक ताशेरे आहेत त्यात. द्वारका महामार्ग कितीपट वाढला. कित्येक वर्षांनी आठवले एनडीए आहे. सध्या त्याला काही आकार उकार विचार नाही. आम्ही सोबत होतो पण कर्मदरीद्रीपणा केलात आणि शिवसेनेला हात लावला. आज कदाचित फुलचे हाफ झालेले फुल झाले असते. कालचा पवारांचा सिंचन घोटळ्याचा संदर्भ. तुमचेपण आत जाण्याचे दिवस येणार आहेत. आमची मशाल नुसते चिन्ह नाही आग आहे. हेलिकॉप्टर ने शेतावर जा आराम मंत्री. अतिवृष्टीचे पैसे अद्याप दुष्काळ आला असून दिलेले नाही. पीकविमा योजना अर्ज भरायला हजार रुपये आणि विमा एक रुपुयात. नुकसानभरपाई किती १०/१५/२५ रुपये. कांदा विषय अजूनही पेटलेलाच. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. हवामान बदललेले आहे. लहान शेतकरी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागते. मराठवाड्यातील एका सर्व्हेचा संदर्भ एक लाख शेतकरी नैराश्यात असल्याचे सांगितले.

होऊन जाऊदे चर्चा ही जन की बात आहे. न्यायालयाचे निर्णय सोयीने बदलायचे दिल्लीचे उदाहरण आता मुंबई टाचेखाली घेण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री असतांना निती आयोगासमवेत बैठका झाल्या पण मुंबईचा आराखडा निती आयोग करेल असा प्रस्ताव कधी आला नाही. मुंबईत घोटाळे प्रशासक बसल्यावर होताहेत. मुंबई आपण रक्ताने मिळवली आहे. आता मुंबईला भिकेला लावा हा ह्यांचा हेतू. कचरा उचलल्या जात नाही. अधिकारी निर्णय घेण्यास धजावत नाही. कमी दिवस आहेत त्यांनी किमान शाप घेऊ नयेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतोय आपल्याला एकाच गावात गुण्यागोविदानं राहायच आहे. निवडणुकांची तयारी आहे. जिथे लोक जमतात तिथे जाऊन लोकांना विचारा. आपण केलेली कामे लोकांना पुन्हा सांगायची त्यांचा प्रयत्न आपण केलेले काम पुसण्याचा. अगदी सगळ्या चौकश्या करा पीएम केअर फंडची पण करा. त्यांची थोतांड उघडी करायची आहेत. लोकांच्या डोळ्यावरची पट्टी आपल्याला काढायची आहे. भाजप कार्यकर्त्यांनी घर घर मोदीची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करा. मी बोलणार होतो कालची घटना झाली त्यावर गृहमंत्री कलंक आहे अस मी आता म्हणणार नाही असा उपरोधिक टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Check Also

वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी

मुंबई काँग्रेसने गुरुवारी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून धारावीच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *