Breaking News

मोठी बातमीः ईडीमध्ये थेट नोकरीची संधी

सध्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकिय नेत्यांच्या ऊरात धडकी भरविणाऱ्या ईडी अर्थात सक्तवसुली संचानलायचे नाव जरी घेतले तरी सत्ताधारी पक्षाची वाट धरणारी अनेक राजकारणी आपण पाहिले. यातील राजकिय तथ्य आणि राजकीय व्यंगाचा भाग वगळला तर सध्या देशातील वाढलेल्या बेरोजगारांसाठी ईडीने गोड बातमी दिली आहे. जवळपास १४ पदांकरीता ईडीने नोकर भरती सुरु केली असून इच्छूकांनी योग्य कागदपत्रांना सोबत घेऊन अर्ज करण्याचे आवाहन बेरोजगारांना केले.

ईडीकडून त्यांच्या अधिकृत एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ईडीचे सहाय्यक संचालक दिपेंद्र कुमार अग्रवाल यांच्या सहीचे एक पत्रक जारी केले असून या पत्रकान्वये उपसंचालक, सहाय्यक कायदेशीर सल्लागार, सहाय्यक संचालक, सक्तवसुली अधिकारी, ज्येष्ठ खासगी सचिव, सहाय्यक सक्तवसुली अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक, स्टेनोग्राफर (ग्रेड १), अप्पर विभागीय क्लार्क, ज्येष्ठ शिपाई, कार्यालयीन वाहन चालक (ग्रेड-२), शिपाई, कार्यालयीन वाहन चालक (साधारण ग्रेड) आदी पदांसाठी ईडीने www.enforcementdirectorate.gov.in या संकेतस्थवर अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच या पदांसाठी कोणीही अर्ज करू शकणार असून दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज स्विकारण्यात येणार असल्याचे सांगत जसजशा जागा रिक्त होत जातील तसतसे संबधित पदांसाठी अर्ज करणाऱ्यास मुलाखतीसाठी पाचारण करून ही पदे भरण्यात येणार असल्याचे ईडीने जाहिर केले.

तसेच या १४ पदांमधील अधिकारी दर्जाच्या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना किमान ४४ हजार ९०० रूपये ते २ लाख ८ हजार ७०० इतक्या स्वरूपात देण्यात येणार आहे. तर क्लार्क शिपाई, वाहन चालक यांना १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० इतक्या स्वरूपात वेतन दिले जाणार आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *