Breaking News

Ladakh : सैन्याचा ट्रक दरीत कोसळून ९ जवान शहीद दरीत बस कोसळून झाला अपघात

लडाख ( Ladakh) येथे आज, शनिवारी संध्याकाळी भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जवान शहीद झालेत. कियारी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या कारू चौकीजवळच हा भीषण अपघात झाला.

याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याच्या ताफ्यात ५ वाहने होती. तर अपघातग्रस्त वाहनात १० सैनिक होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) ९ जवानांचा समावेश आहे.

यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे २९ एप्रिल २०२३ रोजी सैन्याच्या रुग्णवाहिका २०० फूट खोल दरीत कोसळून २ जवान शहीद झाले होते. दरम्यान लडाखमध्ये ( Ladakh)  झालेल्या अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

यासंदर्भात ट्विटरवर जारी केलेल्या संदेशात ते म्हणाले की, लद्दाखमध्ये झालेल्या अपघातात भारतीय सैनिकांच्या मृत्यूमुळे मी दु:खी आहे. वीर जवानांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या सहवेदना आहेत. अपघातातील जखमींना मैदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असे राजनाथ यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नव्या न्यायसंहिता आणि टेलिकम्युनिकेशन कायद्याला राष्ट्रपतींची मंजूरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संसद सुरक्षेचा भंग करत ११ डिसेंबर रोजी दोन देशातील तरूणांनी थेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *