Breaking News

आज पुन्हा संसदेत इंडिया आघाडीचे ४९ खासदार निलंबित, एकूण संख्या १४१ संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह फिरकलेच नाहीत

संसदेत १३ डिसेंबर रोजी सुरक्षा यंत्रणा भेदत देशभरातील सहा राज्यातील सहा तरूणांनी देशातील वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर संसदेत आंदोलन केले. या प्रश्नी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावे या मागणी संसदेत करत आहेत. मात्र मागणी केली म्हणून विरोधी पक्षाच्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण केंद्र सरकारने सुरु केले आहे. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेतील मिळून १४१ खासदारांवर आतापर्यंत निलंबित करण्यात आले.

संसद सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्याप्रकरणी राज्यसभेतील जवळपास विरोधी बाकावरील ५० टक्के खासदारांवर निलंबनाची कारवाई उपराष्ट्रपती तथा पदसिध्द सभापती जगदीप धनकड यांनी कारवाई केली. तर लोकसभेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांनी सकाळपासून सभागृहात संसद सुरक्षेच्या मागणीवरून सातत्याने चर्चेची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली.

हे ही वाचा

धुर हल्ल्यातील एक जण महाराष्ट्रातीलः भाजपा खासदाराच्या शिफारसीवर संसदेत

संसद सुरक्षा प्रश्नी चर्चेची मागणी करणारे विरोधी पक्षाचे ७८ खासदार निलंबित

लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये नॅशनल कॉंन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ अमोल कोल्हे, डिमके पक्षाचे गटनेते टी आर बालू, एम.डी फैजल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंधोपाध्याय, डिंपल यादव, दानिश अली, माला रॉय, सुशिलकुमार रिंकू यांच्यासह ४९ खासदारांना निलंबित करण्यात येत असल्याचे राजेश अग्रवाल यांनी जाहिर केले.

गोंधळ घालणाऱ्या ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करावी याविषयीचा प्रस्ताव केंद्रीय कायदा मंत्री अर्जून मेघवाल यांनी लोकसभेत मांडला. त्यास सत्ताधारी बाकावरील खासदारांनी आवाजी मतदानाने मंजूर केला. त्यावेळी अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सदर प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात आल्याचे जाहिर केले.

Check Also

रोबोटने केली आत्महत्या ? दक्षिण कोरियातील घटना

दक्षिण कोरियातील एका सिव्हिल सर्व्हंट रोबोटने कामाच्या प्रचंड दबावामुळे ‘आत्महत्या’ केल्याची माहिती आहे. डेली मेलच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *