Breaking News

उद्धव ठाकरे यांचा टोला, सरकार आपल्या दारी दुष्काळ उरावरी…. अहमद नगरच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली टीका

काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना २५ टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं. पण २५ टक्के कुठून काढलंत आपण. १०० टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? पाऊस लागला तर सरकार म्हणेल की पाऊसच पाऊस चहुकडे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी अशी परिस्थिती असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टोला लगावला.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, हे तिरपागडं सरकार आहे. तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे. कार्यक्रम, जाहिराती जोरात करतंय. जाहिरांतीवर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे दिले तर बरं होईल, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

सध्या उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई, पुणे आणि अन्य काही ठिकाणे वगळता राज्यातील बहुतांष भागात समाधानकारक पाऊसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहमदनगरचा जिल्ह्याचा दौरा केला.

त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकूणच महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. आता पाऊस लागला तरी तो किती बरसेल, तो बरसल्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. पण दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. जी पिके करपून गेली आहेत, सुकून गेलेल्या पळसामध्ये दाणे भरले जाणार नाहीयत.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, संतापजनक गोष्ट आहे की, गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती त्याची नुकसनाभरपाई अद्यापही मिळालेली नाही. आता नुकसानीचे पंचनामे कधी होतील, ही नुकसान भरपाई कधी मिळेल, १ रुपयाच्या पीकविम्याचे पंचनामे कधी होणार, पैसे कधी मिळणार, कर्ज कसं फिटणार. आपण पाहतो की दर वेळेला काहीतरी होतं, तेव्हा अस्मानी नाहीतर सरकारची सुल्तानी शेतकऱ्यावर कोसळते. मधल्या काळात कांद्याने शेतकऱ्याला रडवलं. आता बोगस बियाणांचा फटका पडला आहे, पीक हाताशी येईल असं वाटत असताना वरुणाजाने पाठ फिरवली. आता तरी तो बरसत असला तरी जे नुकसान झालंय ते सरकारने तात्काळ दिलंच पाहिजे अशी मागणी केली.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *