Breaking News

‘तो’ बॅनर आणि मुख्यमंत्री पदावरून रोहित पवार, निलेश लंकेचे सूचक वक्तव्य

बारामतीत आज बुधवारी दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे भेटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाचे औचित्य साधत संपूर्ण पवार कुटुंबिय कार्यकर्त्ये, सर्वसामान्य नागरीकांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करतात आणि शुभेच्छाही देतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका कार्यकर्त्याने महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार असे लिहिलेले बॅनर कार्यक्रमस्थळी फडकाविले. या बॅनरवर अजित पवार यांनी चांगला बॅनर केलाय अशी सूचक प्रतिक्रियाही व्यक्त केली. मात्र या बॅनरनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आणि रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त करत पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे वक्तव्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल असं विधान केले. लंके यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही सूचक विधान केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे, असं विधान रोहित पवार यांनी केले.

खरं तर, पवार कुटुंबीयांनी आज दिवाळीनिमित्त बारामतीतील गोविंद बागेत भेटीचं आयोजन केलं होतं. पवार कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक याठिकाणी आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतरही अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आपली इच्छा आहे, असं म्हणाले.

आपली इच्छा व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असं अनेक लोकांचं मत आहे. माझंसुद्धा हेच मत आहे. पण शेवटी आपल्याला आकड्यांचं समीकरण लक्षात घ्यावं लागेल. येत्या काळात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल.

एखादी ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल, ज्याचा प्रशासनावर वचक असेल आणि त्यांची काम करण्याची पद्धत लोकांना माहीत असेल. तेव्हा प्रशासनाचीही निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. निर्णय लवकर घेतले तर लोकांनाही याचा फायदा होत असतो असेही ते म्हणाले.

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी सूचक विधान करत म्हणाले,  राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असतील. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून नेमकं कोण मुख्यमंत्री असेल? अशी विचारणा करताच निलेश लंकेंनी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार परिवारातले सहकारी आहोत. परिवारातील ज्येष्ठाने एखादा निर्णय घेतला, तर तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असे सांगत अजित पवार यांचे नाव घेण्याचे टाळले.

Check Also

ममता बॅनर्जी म्हणाल्या, आमचा पक्ष इंडिया ब्लॉक मध्येच तर अधीर रंजन चौधरी यांची स्पष्टोक्ती…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष अजूनही विरोधी पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *