Breaking News

शेतकऱ्यांसाठी पुन्हा दिल्ली बंदीः सिंघू सीमेवर आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या

आपल्या न्याय हक्कांसाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमाफीच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला. घाबरलेल्या केंद्रीय गृह विभागाने मात्र दिल्लीच्या हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशसह सर्व दिल्लीच्या सर्व सीमावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यासाठी सिमेंटच्या बॅरिकेड्स, टोकसाई सळईचे लोखंडी बॅरिके़डस, पाण्याचे टँकर आणि जीसीबी मशिन्स यासह अनेक गाड्या आडव्या ति़डव्या लावत अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. तसेच आंदोलक शेतकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान पंजाब आणि हरियाणातील शेतकरी सिंघु सीमामार्गे दिल्लीच्या दिशेने निघाले. परंतु सिंघू सीमेवरच आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामुळे पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमचक्री निर्माण झाली. तेव्हा आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस आणि अडथळे तोडून दिल्लीच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आंदोलकांच्या दिशेने सोडल्या. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना सिंघू सीमेवरच मोडून काढण्यासाठी लाठीमारही केला. त्यामुळे सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणावर अश्रुधूर पसरल्याचे चित्र पाह्यला मिळाले. मात्र काही काळा आंदोलक शेतकरी सैरावैरा धावले. परंतु पुन्हा एकत्र जमत पोलिसांवरच दगडफेक केली. तर काही ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरचे रूपांतर जेसीबी मशिनमध्ये करत पोलिसांचे बॅरिकेडस उचलून आणण्यास सुरुवात केली.

तसेच पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी आपल्या न्याय मागण्या मान्य झाल्याशिवाय दिल्ली सोडायची नाही असा निर्धार करून सर्व शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचले आहेत. त्यातच शेतकरी संघटनेचे नेते म्हणाले की, आम्ही शेतीमालाला हमी भाव मिळावा या प्रमुख मागणीची आठवण करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे. सरकारच्या पोलिसांनी आणि बंदोबस्तासाठी असलेल्या सैनिकांकडून आमच्यावर लाठीचार्ज केला किंवा आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी त्या आम्ही सहन करू असे सांगत मागील वेळी केंद्र सरकारने शेतमालाला हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता जूने सरकार जावून नवे सरकार येण्याचा कालावधी आला तरी विद्यमान केंद्र सरकार आम्हाच्या मागण्या पूर्ण करत नाही. त्यामुळे आम्ही शांततेत आंदोलन करणार असून जितका कालावधी लागेल तेवढा काळ आम्ही शांततेच आंदोलन करणार असल्याचे सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले होते.

परंतु दिल्ली पोलिसांकडून सिंघू सीमेवर शेतकऱ्यांच्या विरोधात कडक धोरण स्विकारले असल्याने शेतकऱ्यांना माघारी रेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात येत आहे. उलट शेतकऱ्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरला जेसीबीचे स्वरूप देत पोलिसांनी लावलेले बँरिकेडस उचलून आणत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *