Breaking News

उदय सामंत यांचा गंभीर आरोप,… सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न समाजकंटकांना घेऊन जरांगे-पाटील बदनाम करण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राज्यातील ४४१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे . या आंदोलना दरम्यान काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून आंदोलन आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे अनेक लोकांचे वाईट मनसुबे उधळले गेले असा दावाही सामंत यांनी केला .

उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या आंदोलनाच्या केसेस येत्या १५ दिवसात मागे घेतल्या जातील आणि बाकीच्या महिन्याभरात सर्व केसेस मागे घेतले जातील. तसेच नुकसान झालेल्या ४४१ शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्यात येणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने लेखी स्वरूपात नोंदी करून तसे काम सुरू केलेले आहे असेही सांगितले.

उदय सामंत म्हणाले, आमचे सरकार मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण देणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यांना पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, अशी ग्वाही दिली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ठिकठिकाणी आंदोलने झाली या दरम्यान बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या निवास्थानाची तसेच एका भुजबळ समर्थकाच्या हॉटेलची जाळपोळ करून तोडफोड करण्यात आली. या घटनांचा संदर्भ देत उदय सामंत म्हणाले की, मराठा समाजाने २०१४ ते २०१९ मध्ये लाखोंच्या संख्येने शांतपणे संयमाने महाराष्ट्रात मोर्चे काढले कधीच हिंसाचार केला नाही. परंतु यावेळेस काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून सरकारला आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला.

उदय सामंत म्हणाले, काल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले म्हणून अनेक लोकांचे वाईट मनसुबे उधळून गेले. काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळाले पाहिजे तेच लोक काल सहकुटुंब फिरायला गेले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू होते. तरी ही हेच लोक सह परिवार आम्ही ज्या विमानतळावर (गुवाहाटी ) उतरलो त्याच विमानतळावरून फिरायला गेले होते, असा टोलाही उद्धव व आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *