Breaking News

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे, ७८९७ मतांनी विजय

बिगर गांधी घराण्यातील कॉग्रेस पक्षाध्यक्ष होण्याची ही पहीलीच वेळ नाही यापुर्वी पी.व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र त्यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली नव्हती. गेली दहा वर्षात काँग्रेसची देशात झालेली पिछेहाट पहाता नेतृत्वाकडे बोट दाखविण्याचा प्रकार या देशात नवीन नाही हे पहाता काँग्रेसने अध्यक्षपदासाठी निवडणुक घेतली यामध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मलिकार्जुन खर्गे यांनी ७८९७ मतांनी विजय मिळविला तर शशी थरूर यांना १०७२ मते मिळविता आली तर या राष्ट्रीय पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्याकडून ४१६ मतं बाद झाली. हे विशेष म्हणावे लागेल.

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असल्याचे सांगत कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मल्लिकार्जून खर्गे यांचा संसदीय राजकारणात तसेच प्रशासकीय कामाचा दांगडा अनुभव व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, अध्यक्ष निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकुमशाही शक्तींना पराभूत करेल, असा विश्वास व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला त्याबाबत त्यांचे अभिनंदन करून, मल्लिकार्जुन खर्गे यांना ५० वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल असेही ते म्हणाले.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *