Breaking News

राष्ट्रपतींच्या हजेरीविनाच नव्या संसदेच्या कामकाजाचा शुमारंभ पंतप्रधान नरेद्र मोदी, उपराष्ट्रपती धनखड, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला

जून्या संसदेची इमारत गुलामीचे प्रतिक असल्याचे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. नव्या इमारतीतील संसदेत विद्यमान लोकसभेच्या शेवटचे अधिवेशन तरी व्हावे यादृष्टीकोनातून विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. काल जून्या संसदेच्या इमारतीला अलविदा केल्यानंतर आज नव्या संसद इमारतीचा गृहप्रवेश करण्यात आला. मात्र या कार्यक्रमालाही विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण दिलेच नाही. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपतींच्या गैरहजेरीतच संसदेच्या नविन इमारतीतील संसदेच्या कामकाजाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उपराष्ट्रपती धनखड, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, सांसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आदी मंचावर उपस्थित होते.

तसेच संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे खासदार, गटनेते तसेच राज्यसभेतील सर्वपक्षिय खासदार, नेते उपस्थित होते.

यावेळी सेंट्र हॉलमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या इमारतीत नव्या भारताच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्तीचे काम तसेच पुढे सुरु ठेवेल असे सांगत आधीच्या महामानवांच्या कामातून आम्ही अनेक गोष्टी शिकल्या असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज आपण नव्या भारताच्या जडघडणीला सुरुवात करत आहोत. आजचा दिवसही महत्वाचा असून आज गणेशचर्तुर्थीचा दिवस आहे. त्यामुळे आपणा सर्वांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच जी २० चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देश आज आर्थिक सुबत्तेत पाचव्या स्थानावर आहे. आगामी काळात तो तिसऱ्या स्थानी पोहोचल्याशिवाय राहणार नाही असे सांगत आणि व्यापाराचे उदाहरण देताना म्हणाले,आज माझा माल गल्लीबोळात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी विकला जात नसेल तर जागतिकस्तरावर तो कसा विकला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात आज सर्वाधिक तरूण आहेत. या तरूणांना चांगले शिक्षण आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने आपण नवी शिक्षण पध्दती राष्ट्रीय धोरण आणले आहे. त्यातंर्गत देशात शिक्षणासह रोजगाराचे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे सांगत हे धोरण सर्वसहमतीने तयार करण्यात आल्याचे सांगितले.

तसेच जगामोर जाण्यासाठी आता देशातील गरजांबरोबरच आंतरराष्ट्रीय गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे लागणार असल्याचे सांगत नर्सिंगच्या क्षेत्रात जगभरात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे देशातील मुला-मुलींना तेथे रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. देशाबरोबरच परदेशातही रोजगार मुबलक स्वरूपात असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या भाषणावेळी काँग्रेसला चिमटा काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मधल्या काळात काही केंद्र सरकारांनी वेगळा मार्ग काढण्याचा शाहबानो खटल्याच्या निमित्ताने वेगळा प्रयत्न केला. मात्र तो त्या पक्षावर उलटाच चालल्याचे लक्षात आले. मात्र आमच्या सरकारने त्यात सुधारणा करत तीन तलाक कायदेशीर गुन्हा ठरविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

यावेळी मोदी यांनी आपण विश्वामित्र बनू पहात असल्याचे सांगत जागतिकस्तरावर आपण अनेक चांगले मित्र निर्माण करत आहोत. तर काही जण आपल्याला मित्र बनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *