Breaking News

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ २५ सप्टेंबरला उघडणार, तपशील जाणून घ्या २७ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार

जेएसडब्ल्यू समहूातील कंपनीचा आता १३ वर्षानंतर आयपीओ येणार आहे. समहातील कंपनी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ २५ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडणार आहे. हा आयपीओ गुंतवण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत खुला असेल.

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरच्या आयपीओसाठी ११३-११९ रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनी आयपीओमधून २८०० कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओमध्ये फक्त नवीन शेअर्सची विक्री होईल. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरने मे २०२३ मध्ये सेबीकडे आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे सादर केली होती.

आयपीओमधील ७५ टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि १० टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आयपीओतून उभारलेला निधी कर्ज कमी करण्यासाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी वापण्यात येणार आहे. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर ही जेएसडब्ल्यू समूहाची शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी तिसरी कंपनी आहे. समूहाच्या इतर सूचीबद्ध कंपन्या जेएसडब्ल्यू एनर्जी आणि जेएसडब्ल्यू स्टील आहेत.

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चचा एप्रिल-जून २०२३ या तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक ७ टक्क्यांनी वाढून ८७८ कोटी रुपये झाला आहे. तर निव्वळ नफा ६८ टक्क्यांनी वाढून ३२२ कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष २०११-२३ मध्ये कार्गो हाताळणी क्षमता आणि कार्गो व्हॉल्यूमच्या बाबतीत जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात वेगाने वाढणारी पोर्ट संबंधित इन्फ्रा कंपनी होती.

Check Also

केंद्रीय अर्थसंकल्पात कर कपातीमुळे या वस्तू स्वस्त तर त्या होणार महाग अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली घोषणा

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *