Breaking News

आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल, बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी त्यांच्याच फोटोवर हातोडा आणि बुलडोझर…

वांद्रे येथील ठाकरे गटाच्या शाखेवर आज मुंबई महानगर पालिकेने आज कारवाई केली आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत ही कारवाई झाल्याचं पालिकेकडून सांगण्यात येतंय. परंतु, यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि मुंबई पालिकेवर टीकास्त्र सोडलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय हेतूने आणि चिंधी मनाने या कारवाया होत आहेत. हे देशासमोर नाही तर जगासमोर येत आहे. जगात कोणालाही विचारलं तर गद्दारी चिंधी लोकांनी केली आहे. जे घाबरट आणि पळून गेले. व्हिडीओमध्ये दिसतंय की (कारवाईच्या) खोक्यांच्या राजवटीत बीएमसीत हुकुमशाही सुरू आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे चालवत आहोत. पण त्यांच्याच फोटोवर हातोडा मारला आणि बुलडोझर चालवला आहे. हे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सहन करणार आहे का? हे सगळं सच्चा शिवसैनिक लक्षात ठेवणार आहे, असा इशाराही दिला.

दरम्यान, वांद्रे पूर्वतील बेहराम पाडा येथे ठाकरे गटाचे शाखा कार्यालय आहे. माजी नगरसेवक हाजी अलम खान यांचे हे कार्यालय असून पालिकेने त्यावर आज हातोडा मारला. ही शाखा नसून रिक्षा स्टॅण्डचा एक भाग असल्याचं पालिकेकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं. परंतु, ही शाखाच असल्याचा दावा हाजी अलम खान यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. हे बांधकाम परवानगी न घेता करण्यात आल्याने त्यावर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केली या बातमीचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इन्कार केला. मात्र तुम्ही मातोश्रीच्या बाहेर येऊन पाहिलंत तर तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. तो ठाकरे कुटुंबाचा विषय असल्याने मी त्यावर बोललो नाही. मात्र इतकंच सांगेन की आमचं सुरक्षा कवच हे बाळासाहेब ठाकरे आणि भारतातली जनता आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या आणि खोके वृत्तीच्या विरोधात लढत आहोत, आम्ही लढत राहणार असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *