Breaking News

काँग्रेसच्या बिगर गांधी अध्यक्ष पदासाठी सोमवारी मतदान राज्यभरातील ५६१ मतदार बजावणार आपला मतदानाचा हक्क

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. विशेष म्हणजे २४ वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसला बिगर गांधी घराण्याच्या अध्यक्ष पदासाठी मतदान सोमवारी मतदान होणार आहे. बिगर गांधी घराण्याचे शेवटचे अध्यक्ष स्व.सीताराम केसरी आणि पी.व्ही.नरसिह राव हे होते.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी सोमवारी मतदार होणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार असून महाराष्ट्रातही मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. आज त्यांनी टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ओळखपत्र जसे की मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.

काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यात थेट लढत होत आहे. या दोघांकडूनही काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जवळपास पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या, वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला.
या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर असे दोन उमेदवार आहेत.  मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.

 

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *