Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या मंत्र्यांनी निर्णय घेतला त्यांच्याच बरोबर सत्ता उपभोगायची… राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर झेपत नसेल तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगावं

भारतीय जनता पक्षाबद्दल हसावं आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्न बद्दल काय बोलावं हा प्रश्न मला पडला आहे. माझी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहतच असाल. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी तर हिंसाजनक परिस्थिती आहे. त्यात भाजपाचे कार्यकर्ते यांच्यात देखील वाद झाल्याचं कळतंय. या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्री महाराष्ट्राचे नसून भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला हवं की, आपण सत्तेत आहोत. सत्तेत असणारा पक्ष जर अशा पद्धतीची वागणूक महाराष्ट्रात करत असेल आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत असेल आणि हे सर्व काम जर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगावं आम्हा सर्व खासदारांना बोलवाव महाराष्ट्राच्या सुरक्षेचा तोडगा काढावा असेही सांगितले.

सुप्रिया सुळे यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जे आंदोलन करत आहेत ते फक्त शरद पवार यांच्या विरोधात आहे. २०११ ते २०२१ च्या कंत्राटी भरतीच्या जीआरच्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. कॅबिनेटमध्ये देखील नव्हते. आणि त्यावेळी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, हसन मुश्रीफ हे सर्व त्यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. माझी देवेंद्र फडणवीस आणि सरकारला विनंती आहे की, ज्यांच्या सहीमुळे हा निर्णय झाला तुम्ही त्यांचे राजीनामे घ्या. आणि या गोष्टीला माझा वैयक्तिक रित्या तुम्हाला पाठिंबा आहे. मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष याचा न्याय मला नक्की देतील अशी मला आशा आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने वाढत्या प्रदूषणाबद्दल लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. आणि महत्वाचं म्हणजे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री खाजगी विमानाने पालकमंत्री ठरवण्यासाठी दिल्ली दरबारी जाऊ शकतात, पण नांदेडमध्ये घडलेल्या अतिशय वाईट दुर्घटनेच्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी रुग्णांची विचारपूस करण्यासाठी जाऊ शकत नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून हे असंवेदनशील खोके सरकार आहे. भाजपा फक्त पक्ष आणि घर फोडण्याचे काम करत आहे असा हल्लाबोलही केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडायची खोड आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवा बाण’ सोडण्याची हिंमत केली नसती, असा टोला लगावला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजपा वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही, असेही स्पष्ट केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *