Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हेडगेवारांच नाव जातयं २५ टक्क्याने सुरुवात झालीय…. काँग्रेसचा डिएनए असलेला व्यक्तीच पक्तींला बसतोय याचा अभिमान

काही दिवसांपूर्वी २०२४ साली राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजित पवार यांना बसविणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. त्यामुळे मला भाजपाच्या कार्यकर्त्यांविषयी दुःख होतोय कारण आपल्या विरोधात संघर्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र अभिमान एकाच गोष्टीचा असून जरी काँग्रेसच्या डिएनएची माणसे तिकडी गेली तर पक्तींला मात्र त्यांनाच बसविलं जात असून त्यांच्यात टॅलेटचा अभाव असल्याची टीका भाजपाचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्यावतीने महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा यशवंतराव चव्हाण येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे जेव्हाही भेटत असतात तेव्हा मी त्यांना थम्बस अप करते, त्यावेळी विचारले की त्यांना जेव्हाही भेटता तेव्हा थंम्पसअप का करते? कारण हेमंत बिस्वा सरमा यांचा मुळ डिएनए हा काँग्रेसचा आहे. इतकेच काय तिकडचे काही जण जे काही लेक लाडकी वगैरे करतात ते इथूनच ट्रेनिंग घेऊन तिकडे गेलेत आणि आता ते तिकडचे काम करत असल्याचे सांगत भाजपाच्या चित्रा वाघ आणि इतरांवर त्यांचे नाव न घेता टीका केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्हाला आठवतंय का की काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी केली होती. मात्र आज तेच लोक काँग्रेसचा डिएनए असलेल्या लोकांना पहिल्या पक्तींला बसवून गरमगरम जेवण वाढत आहेत असा टोला भाजपाला लगावत हे सगळं का होतय तर केवळ त्यांच्याकडे टॅलेंटचा अभाव आहे. त्यामुळे आपल्या लोकांना ते तिकडे घेवून जात आहेत असा उपरोधिक टीकाही केली.

अजित पवार यांनी उल्लेख केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या नामोलेखावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मध्यंतरी काही जण यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले. त्यामुळे मला एक वाटते की, त्यांना कळून चुकले आहे की, हेडगेवार सारख्यांची नावं घेतल्याने त्यांना मतं मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना यशवंतराव चव्हाण यांच नाव घ्यावं लागतयं. आता तर ही २५ टक्क्याने सुरुवात झालीय उरलेले ७५ टक्केही यशवंतराव चव्हाण यांचे नाव घ्यायला लागतील असा उपरोधिक टोला अजित पवार गटाला लगावत भाजपावर टीका केली.

तसेच सुप्रिया सुळे म्हणाल्या, जर २०२४ नंतर जर अजित पवार हे पाच वर्षासाठी मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना पहिला हार घालायला मी पुढे असेन असे सांगत आमची कोणाशीही वैयक्तीक लढाई नाही. जी काही ती वैचारिक लढाई असल्याचेही स्पष्ट करत सर्वात आधी तो माझा भाऊ आहे असे सांगायलाही विसरल्या नाहीत.

तसेच पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे, नागपूर, नाशिक येथे ज्या मेट्रो सुरु करण्यात आल्या त्यापेक्षा आमचं सरकार असतं तर सर्वात आधी तो पैसा मेट्रोसाठी खर्च करण्याऐवजी एसटीला आणि महानगरपालिकांच्या बसेसला दिला असता आणि स्थानिक नागरिक आणि महिलांचा प्रवास सोयीचा केला असता असे सांगत आज नाशिक, पुणे, नागपूर येथे मेट्रो सुरु झाल्या आहेत त्या नुकसानीत असल्याचंही सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपलं सरकार सत्तेत आल्यानंतर विना परवानगी होर्डींग लावण्याबाबत सर्वपक्षियांसाठी कायदा करू असे सांगत उपस्थित महिला कार्यकर्यांनीही बॅनरबाजी आणि होर्डींगच्या भानगडीत पडू नये असे आवाहनही केले.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *