Breaking News

सुनिल तटकरे म्हणाले, …मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार… अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पक्षातील पदाधिकार्‍यांचा पक्षप्रवेश...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. दोन वेळा आरक्षण दिले गेले, मात्र ते दोन्ही न्यायालयांनी रद्दबातल केले अशावेळी कायद्याच्या कसोटीवर आरक्षण देत असताना आणि शेवटचे आरक्षण रद्द करत असताना सर्वोच्च न्यायालयाने जी टिप्पणी केली, ज्या उणीवा दाखवल्या आहेत. त्याची पूर्तता करुनच ते आरक्षण देणार असा राज्य सरकारने निर्धार केला. त्याला कालावधी लागू शकतो. महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देईल आणि तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता असा विश्वास अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

अजित पवारच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षाची वाढती ताकद लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जिल्हयातून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश गेल्या दोन दिवसात झाले आहेत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.

परभणी, लातूर, सोलापूर, नवी मुंबई येथील अनेक विविध पक्षातील पदाधिकारी व तरुणांनी गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले, कर्जत येथे झालेल्या चिंतन शिबिरात प्रत्येक जिल्हाध्यक्षांना पक्षवाढीचे काम करण्यासाठी वाहन देण्याची चर्चा झाली होती. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या राज्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी गाड्या देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्याची लवकरच अंमलबजावणी होईल असेही सांगितले.

सुनिल तटकरे शेवटी म्हणाले, बोलघेवड्या आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या कुणाही व्यक्तीच्या वक्तव्यावर मी बोलू इच्छित नाही. मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचे नाही असा टोलाही विरोधकांना लगावला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *