Breaking News

अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचे खातेवाटप रखडले, पण बंगले- दालनांचे वाटप झाले शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्र्यांना घाई

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे खातेवाटप रखडले असले तरी मंत्र्यांना मंगळवारी बंगले व दालनांचे मात्र वाटप आज करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला कायम असून अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिळालेला ए ५ बंगला आता राष्ट्रवादी भवन झाल्याने त्यांना आता कोणता बंगला मिळणार याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार नव्या मंत्र्यांना करण्यात आलेल्या बंगल्याची आणि मंत्रालयातील दालनांचे वाटप पुढील प्रमाणे…

मंत्री – सरकारी निवासस्थाने –  दालने
छगन भुजबळ – ब-६ सिद्धगड – मंत्रालय दालन क्रमांक २०१
हसन मुश्रीफ – क-८ विशाळगड – मंत्रालय दालन क्रमांक ४०७

दिलीप वळसे पाटील – क-१ सुवर्णगड – मंत्रालय दालन क्रमांक ३०३
धनंजय मुंडे – क-६ प्रचितगड – मंत्रालय दालन क्रमांक २०१ ते २०४ आणि २१२

धर्मरावबाबा अत्राम -सुरुचि -३ – विस्तारीत इमारत दालन क्रमांक ६०१, ६०२ आणि ६०४
अनिल पाटील – सुरुचि – ८ – मंत्रालय दालन क्रमांक ४०१

संजय बनसोडे – सुरुचि – १८ – मंत्रालय दालन क्रमांक ३०१
अदिती तटकरे – ——– मंत्रालय दालन क्रमांक १०३

 

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *