Breaking News

संजय राऊत म्हणाले, दिल्लीत गेले तेव्हा मेंदू गहणा ठेवले की काय? महाराष्ट्र प्रेम खोक्याकाली दबलं गेलंय

महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील राज्यपाल आणि भाजपाच्या मंत्री, आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने महाराष्ट्र विरोधी केलेल्या वक्तव्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खा. संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल राजभवनात बसला आहे. दिल्लीत गेले तेव्हा मेंदू गहाण ठेवून आले की काय? असा सवाल करत काय झालं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. तुम्ही लाचार आहात, मिंधे आहात, खोकी मोजत बसा. आम्ही अपमानाच्या विरोधात लढू अशी टीका केली.

सरकारवर घणाघात होणार, या भीतीने पाय लटपटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेरा अटी शर्ती घातल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल त्यांनी शिंदे सरकारवर केला.

हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, भाषण लिहून द्या आता. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तसेच, यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी मोर्चाच्या ठिकाणी पोहचल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे मोर्चे पाहिले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा मोर्चा पाहून तेव्हाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, तेव्हाचे मोर्चे हे महाराष्ट्र प्रेमाने भारवलेले होते. आताही समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील राज्यपाल आणि भाजपाच्या मंत्री, आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने महाराष्ट्र विरोधी केलेल्या वक्तव्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खा. संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल राजभवनात बसला आहे. दिल्लीत गेले तेव्हा मेंदू गहाण ठेवून आले की काय? असा सवाल करत काय झालं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. तुम्ही लाचार आहात, मिंधे आहात, खोकी मोजत बसा. आम्ही अपमानाच्या विरोधात लढू अशी टीका केली.

सरकारवर घणाघात होणार, या भीतीने पाय लटपटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेरा अटी शर्ती घातल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल त्यांनी शिंदे सरकारवर केला.

हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, भाषण लिहून द्या आता. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तसेच, यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेलं आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी मोर्चाच्या ठिकाणी पोहचल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे मोर्चे पाहिले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा मोर्चा पाहून तेव्हाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, तेव्हाचे मोर्चे हे महाराष्ट्र प्रेमाने भारवलेले होते. आताही समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *