Breaking News

सुप्रिया सुळे यांच्या नव्या जबाबदारीबाबत शरद पवार यांचे वक्तव्य, कोणतीही जबाबदारी घेण्यास.. लोकसभा निवडणूक होईपर्यंत जबाबदारी नाही

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांचा राजीनामा स्विकारण्यास विरोध केला. तर राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान समोर ठिय्या आंदोलन केले. तसेच राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी शरद पवार यांना वैयक्तिक फोनवरून राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहिर केले. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी उत्तराधिकारी आणि पक्षाचे नवे नेतृत्व निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे जाहिर केले. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी काळात पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याच्या चर्चेला जोर आला. या सगळ्या घडामोडींवर शरद पवार यांनीच भाष्य केल्याने यास वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग, तिथली उपस्थिती, चर्चासत्रांमध्ये विचारलेले विविध प्रश्न आणि संसदेत मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांना यापूर्वी तब्बल सात वेळा हा पुरस्कार मिळाला आहे.

नुकतेच सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील कामकाजाची दखल संसदेपाठोपाठ एका इंग्रजी साप्ताहिकाने घेत सर्वोत्कृष्ट खासदार म्हणूनही त्यांची निवड केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि सुप्रिया सुळे यांच्या कामाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांची दिल्लीच्या वर्तुळात चांगलीच उठबस असून त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या असतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

आधीच जाहिर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पंढरपूर दौऱ्यावर आले असून येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न केला की, सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, सुप्रिया सुळेंची वेगळी इच्छा आहे. एका वर्षात लोकसभा निवडणूक आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत मतदारांव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी घेण्यास त्या इच्छूक नाहीत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, जीनाच्या थडग्यावर डोकं टेकविणारे नेते चालतात….

काल कोकणच्या दौऱ्यात माझ्या सोबत काही मुस्लिम आले. या माझ्या भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी मला त्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *