Breaking News

राहुल गांधी यांचा आत्मविश्वास, आगामी निवडणूका आम्हीच जिंकू चार विधानसभांपैकी ३ ठिकाणी आम्ही जिंकणार तर राजस्थानमध्ये सत्तेच्या जवळ जाऊ

आगामी काही महिन्यात देशातील चार राज्यांच्या विधानसभांचा निवडूकीचा कार्यक्रम जाहिर होणार आहे. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राज्यस्थान राज्यातील विधानसभांचा पाच वर्षाचा कालवधी पूर्ण होणार आहे. या चार पैकी तीन राज्यात काहीही करून सत्ता हस्तगत करायची या उद्देशाने भाजपाकडून तयारी सुरु केली असतानाच काँग्रेसनेही आपल्या ताब्यातील दोन राज्यात पुन्हा ताब्यात ठेवून मध्य प्रदेश तेलंगणा पुन्हा खेचून घेण्याचा, तर राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

यासंदर्भात मिझोरोम येथील एका प्रसारमाध्यमाच्या कॉनक्लेव मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील दावा केला.

राहुल गांधी म्हणाले की, आगामी चार राज्यातील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील विधानसभा निवडणूका जिंकूच. पण तेलंगणामधील विधानसभा निवडणूका जिंकूच. पण राजस्थानमध्ये काटेकी टक्कर होईल असे सांगत मात्र सत्तेसाठी आवश्यक असलेल्या आकडेपर्यंत आम्ही पोहोचू असे स्पष्ट केले.

त्याचबरोबर मिझोरोम येथेही वर्ष अखेरीस निवडणूका होत आहेत.

सध्या काँग्रेसच्या ताब्यात राजस्थान आणि छत्तीसगड राज्ये असून तेलंगणा सध्या के चंद्रशेखर राव यांच्या ताब्यातील तेलंगणा राष्ट्रसमिती अर्थात भारत पार्टी पक्षाची सत्ता तेथे आहे. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत तेथील खरी लढत भारत पार्टी आणि एमआयएम मध्येच असली तरी काँग्रेसला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भारत पार्टी ही तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. त्यामुळे काँग्रेसला तेथे विजयाची आशा आहे. तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पारंपारीक विरोधकांशी काँग्रेसशी प्रामुख्याने लढत होणार आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूका निश्चितच जिंकू तसेच तेलंगणामध्ये बहुत करून काँग्रेसला जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे तेथील राज्यही काँग्रेसला परत मिळेल. तसेच राजस्थानमध्येही सत्तेच्या जवळ राहू त्यामुळे तेथील राज्य राखण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला.

याशिवाय राहुल गांधी म्हणाले की, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील निवडणूकांच्या अनुषंगाने आम्ही करत असलेल्या प्रचारात आमचीच आघाडी आहे. तसेच या तिन्ही राज्यात भाजपा कुठेच नसून लोकांमधील प्रचारात भाजपा कुठेच नाही.

तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून भाजपा सगळ्या गोष्टी कंट्रोल करत आहे. पण आम्ही विरोधात आहोत हे आम्ही स्विकारले असून विरोधक म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी स्विकारून आम्ही करत आहोत. तसेच विरोधक म्हणून आम्ही कमकुवत नाही तर सक्षम आहोत हे आश्चर्यकारक रित्या २०२४ च्या निवडणूकीत दिसेल असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *