Breaking News

राहुल गांधी यांनी भाजपा महिला खासदारांना पाहुन केले फ्लाईंग किस? वाचा नेमकं काय घडलं राहुल गांधी यांच्या भाषणामुळे चिडलेल्या भाजपा महिला खासदारांच दावा

मोदी आडनाव बदनामी प्रकणावरील गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली. त्यानंतर राहुल गांधी आज ९ ऑगस्ट रोजी लोकसभेतही परतले. लोकसभेत परतल्यावर अविश्वासदर्शक ठरावावर आपले मत व्यक्त करताना केलेल्या पहिल्याच भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्यासह विरोधी बाकावरील खासदारांनी मणिपूरप्रश्नी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृहात राहुल गांधींनी केलेल्या एका कृतीमुळे राजकीय वातावरण तापलं. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या महिला सदस्यांनी राहुल गांधी यांच्यावर फ्लाईंग किस केल्याचा आरोप करत त्यांच्या या कृतीविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली.

लोकसभेत सोमवारी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. यावर आज ९ ऑगस्ट राहुल गांधी यांनी भाषण केलं. भाषण करून राहुल गांधी यांनी लोकसभा सभागृह सोडलं. राहुल गांधी बाहेर पडत असताना त्यांच्या हातातल्या काही फाईल्स खाली पडल्या. त्या फाईल्स उचलण्यासाठी राहुल गांधी खाली वाकले. तेव्हा तिथे बसलेले भाजपा खासदार राहुल गांधींवर हसले. भाजपा खासदारांच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधींनी या सर्व खासदारांना पाहून फ्लाईंग किस केलं. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला नसला तरी काही साक्षीदारांकडून माहिती घेत इंडिया टूडेनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मोदी आडनाव बदनामी प्रकणावरील गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ९ ऑगस्ट लोकसभेतही परतले. लोकसभेत परतल्यावर केलेल्या पहिल्याच भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

दरम्यान, अल्ट न्युजचे महोमद झुबेर यांनी भाजपाने केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने ती घटना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्हिडिओ काही उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु १ वाजून १० मिनिटांनी पायल मेहता यांनी राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस केल्याचे ट्विट केले. त्यानंतर १ वाजून २२ मिनिटांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाजपाच्या महिला खासदारांना पाहुन प्लाईंग किस केल्याचा मुद्दा लोकसभेत केला.
दरम्यान अद्याप लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला य़ांनी अद्याप त्या बाबत कोणतीही टीपण्णी आज तरी केली नाही.

Check Also

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली

शिक्षक आमदारकीची निवडणूक १० जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *