Breaking News

अखेर कतार न्यायालयाने शिक्षेच्या विरोधातील स्विकारली भारताची याचिका

साधारणतः महिनाभरापूर्वी कतारमधील भारतीय माजी नौसैनिकांना हेरगिरी आणि देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र भारत सरकारकडून त्यावर अधिकृतरित्या काहीच सांगण्यात येत नव्हते. अखेर नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या दबावामुळे आणि प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे भारत सरकारकडून फाशीच्या शिक्षेविरोधात कतार न्यायालयात दाखल केलेली याचिका दाखल करून घेतली.

वास्तविक पाहता कतार आणि भारत सरकारबरोबर मैत्रीपूर्ण संबध आहेत. तरीही भारतीय माजी नौसिकांना मागील वर्षी हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात देशात जी-२०चे समेंलन झाले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी दौऱ्यावर जाऊन आले. पण भारतीय परदेशी दूतावासाकडून या नौसिकांच्या सुटकेसाठी कोणतीच मदत केली नाही. त्याचबरोबर नौसिकांच्या कुटुंबियांना कोणती माहिती दिली नाही.

मात्र प्रसारमाध्यमातील वाढता दबाव आणि सध्या देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूका आणि लगोलग काही महिन्यांच्या अंतराने होत असलेल्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कतार न्यायालयाने भारतीय माजी नौसैनिकांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर आर्श्चय व्यक्त केले होते. तसेच यासंदर्भात योग्य ती मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने कतारच्या न्यायालयात भारतीय नौसैनिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात अपील दाखल केले आणि राजनैतिक संबधाच्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानेही भारताचे अपील दाखल करून घेतले.

आता भारत सरकारने कतार येथील न्यायालयात अपील दाखल केल्याने या माजी नौसैनिकांच्या सुटकेच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांच्या कुटुंबियांनाही दिलासा मिळाला आहे.

या भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली

भारतीय नौसैनेत चांगली कामगिरी बजावणारे कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन ब्रिरेंद्रकुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ट, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरेंदु तिवारी, कमांडर सुगुनकुमार पकाला, कमांडर संजीवकुमार गुप्ता, सेलर रागेश या आठ भारतीय माजी नौसैनिकांना कतारची राजधानी दोहा येथे मागील वर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात अटक करण्यात आली होती.

कतार सैन्याला संरक्षण विषयक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीमध्ये हे आठही जण कंत्राटी पध्दतीने प्रशिक्षक पदावर काम करत होते. मात्र ज्या कंपनीकडून कतारच्या नौसैनिकांना प्रशिक्षण देण्याचे काम करत होते. ती कंपनी अचानक बंद झाली. तसेच त्या कंपनीचे दिवाळे वाजल्याचे जाहिर करण्यात आली. या आठ जणांनी प्रशिक्षणा दरम्यान एका बोटीची पाहणी करून आपापसात चर्चा केल्याच्या कारणावरून त्यामुळे ते हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून कतारच्या पोलिसांनी या आठही जणांना अटक केली.

दरम्यान, कतार न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत भारतीय परराष्ट्र खात्याने , परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, परराष्ट्र खात्याचे सचिव अरविंद बागची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर खात्यावरून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *