Breaking News

राजकारण

रस्ताने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता विम्याचे सुरक्षा कवच मिळणार स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला यापुढे विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयांतर्गत अपघातात मरण पावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना किंवा अपघातात जखमी होणाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  यासाठी राज्य आरोग्य …

Read More »

१२ हजार पोलीस शिपायांची भरती लवकरच: राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या ४ मे २०२० च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार पोलिस शिपायांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. …

Read More »

कांदा निर्यातबंदी रद्द करेपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरुच राहिल ! काँग्रेसच्या आंदोलनाला राज्यभर प्रचंड प्रतिसाद

मुंबई: प्रतिनिधी कोरानाच्या संकटात झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असताना मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत असताना अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकार …

Read More »

महाराष्ट्राच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा राज्याला मिळाला ई पंचायतराज पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – २०२०  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

आता देवेंद्र फडणवीस यांची गोयल यांना विनंती म्हणाले कांदा निर्यातीवरील बंदी हटवा

मुंबई : प्रतिनिधी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेत्यांनी केंद्राच्या या निर्णयावर टीका करत या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त करत चुकीचा निर्णय असल्याची टीका केली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

जयंत पाटील म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढलेय गंगाखेडचे माजी आमदार व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या इनकमिंगचे प्रमाण वाढले असून परभणी जिल्ह्यातील माजी आमदार सिताराम घनदाट यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार …

Read More »

राज्यपाल कोश्यारींनी जलसंपदा मंत्र्यांना दिले आदेश पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या व प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा

मुंबई : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधीव्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा या मागणीवर  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्यातील पाच हजार कोटी रूपयांवरील प्रकल्प जे पूर्णत्वाकडे पोहचले आहेत, त्याचबरोबर पर्यावरण परवानगी किंवा इतर काही कारणांसाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती सादर …

Read More »

बॉलिवूड व ड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्वीन’ का परत गेली ? महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा अजेंडा उघड: काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबई व महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे ,असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला. परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच …

Read More »

घरगुती कामगार कल्याण मंडळाला १०० कोटी द्या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या घरगुती काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी घरगुती कामगार कल्याण मंडळाला राज्यसरकाने तात्काळ १०० कोटी रुपयांची मदत करून राज्यात बंद असलेली घरगुती कामगारांची नोंदणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली. देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता …

Read More »

संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक मंत्री देशमुख यांचे आश्वासन

लातूर : प्रतिनिधी समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री  तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. कोविड१९ पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. …

Read More »