Breaking News
Responsive Iframe Example

राजकारण

उद्योगासह चार खाती चालवायला सरकारने माणसे आऊटसोर्सिंग केलीत का? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार हे आपले सरकार आहे असे प्रचार करते पण शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही पण वेगळीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत बिलावकर, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग किर्तीकुमार केडियार हे चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत. तर …

Read More »

“आंधळ्याशी जग आंधळे, तया जग खोटे” मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतित्तुर मस्करी करा, थट्टा करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका असा फडणवीस, मुनगंटीवार यांना इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोना परिस्थितीबरोबरच इतर मुद्यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावंर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोरदार उत्तर देत आंधळ्याशी जग आंधळे, तया जग खोटे असा संत तुकारामाच्या अंभागातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार करत टीका करायची असेल तर खुशाल करा पण …

Read More »

आया बहिणी सुरक्षित नसतील तर राज्यात राष्ट्रपती राजवट जळगांव प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असून जळगाव येथील वसतिगृह प्रकरणांवरुन संताप व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत आमच्या आया-बहिणीची थट्टा होणार असेल आणि त्या सुरक्षित नसतील तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असल्याचे म्हणत त्यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुनगंटीवार …

Read More »

“…येथे येर गबाळ्याचे काम नाही” म्हणत फडणवीसांचा चौफेर हल्ला राज्य सरकारचे काढले वाभाडे

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर हल्ला चढवित कोरोना काळातील भष्ट्राचार, राज्यपालांना देण्यात येत असलेली वागणूक, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी प्रश्नांसह विविध प्रश्नांवर चोहोबाजूने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेरत चौफेर हल्ला चढवित सत्तेच्या येथे येरा गबाळ्याचे काम नाही असे सांगत राज्य …

Read More »

शेलार म्हणाले, बेस्टच्या थकबाकीदार बिल्डरांची एसआयटी मार्फत चौकशी करा भाजपा आमदारांची आक्रमक भूमिका तर मंत्र्यांची सावध भूमिका

मुंबईः प्रतिनिधी आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाची बिल्डरकडे गेले १३ वर्षे असलेल्या थकबाकी आणि त्यात होत असलेल्या विलंबाबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा अशी आग्रही मागणी भाजपा आमदारांनी विधानसभेत आज केली. बेस्ट उपक्रमाच्या डेपोंचा व्यावसायिक वापर करण्यासाठी विकासकांना देण्यात आले. यावेळी झालेल्या करारानुसार बेस्टला देय्य असलेल्या रकमेपैकी ३२० कोटी बिल्डरकडे थकित असल्याचे तारांकित …

Read More »

अजित पवारांचे आदेश, कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नका विरोधकांच्या प्रश्नावर अजित पवार यांची ग्वाही

मुंबईः प्रतिनिधी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज मंडळाकडून वीज ग्राहक आणि कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीज जोडणी तोडण्यासंदर्भात बजाविण्यात आलेल्या नोटीशीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यत ग्राहकांची वीज तोडू नका असे आदेश वीज मंडळाच्या विभागाला दिले. शेतकऱ्यांचे कृषीपंप …

Read More »

वैधानिक महामंडळावरून अजित पवार विरुध्द फडणवीस-मुनगंटीवार आमने सामने विरोधकांची अजित पवारांवर टीकेची झोड

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यापालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना आणि निधीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी ती १२ आमदारांची यादी मंजूर केल्यानंतर लगेच संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वैधानिक महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे उत्तर देताच संतापलेल्या फडणवीसांनी बघु …

Read More »

राज्यपाल म्हणाले, महसूली जमा कमी.. केंद्राकडे जीएसटीची थकबाकी आर्थिक परिस्थितीविषयी पहिल्यांदाच राज्यपाल आणि राज्य सरकारचे एकमत

मुंबईः विशेष प्रतिनिधी जीएसटी करापोटी केंद्र सरकारकडून नुकसान भरपाई पोटी मिळावयाची रक्कम येणे बाकी असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज दिली. तसेच राज्याच्या हिश्शाची ४६ हजार ९५० कोटी रूपयांपैकी फक्त ६ हजार १४० कोटी रूपये फक्त राज्याला मिळाले असून ११ हजार ५२० कोटी रूपय नुकसानभरपाई पोटी कर्ज म्हणून दिले आहेत. …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला खा.डेलकर आत्महत्याप्रकरणी भाजपाला इशारा राठोडांवर गुन्हा दाखल मग खा.डेलकर आत्महत्या प्रकरणी का विचारत नाही?

मुंबईः प्रतिनिधी पुण्यात झालेल्या आत्महत्या प्रकरणात कोणतीही सुसाईड नोट नव्हती. तसेच त्याविषयीची तक्रारही कोणाची नाही. चव्हाणच्या आई-वडीलांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास दाखविला असतानाही विरोधकांकडून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आत्महत्येबद्दल मागणी करत असताना मात्र मुंबईत सातवेळा निवडूण आलेल्या खासदाराने भाजपातील उच्च पदस्थांची …

Read More »

दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात प्रदेश काँग्रेसची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निचांकी पातळीवर असताना देशात मात्र इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी १ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री …

Read More »