Breaking News

“जरा जाऊन बघुन येतो” सांगणाऱ्या नेत्याच्या मतदारसंघातून शरद पवार यांच्या दौऱ्याचा झंझावात येवला (नाशिक) येथे राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार फोडणार ;महेश तपासे यांची माहिती...

५ जुलै रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या फुटीरांवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्याचा नावासह उल्लेख करत म्हणाले, छगन भुजबळ यांचा मला सकाळी फोन आला होता. ते म्हणाले, मी जरा तिकडे (अजित पवारांकडे) जाऊन बघुन येतो, काय नेमकं काय चाललयं ते. पण ते तिकडेच गेले असे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर आंबेगावचे आमदार तथा शरद पवार यांचे जूने स्वीय सहाय्यक दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघातून फुटीरांच्या मतदारसंघातून शरद पवार यांचा झंझावात सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात येणार होती. मात्र आत त्यात थोडासा बदल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा झंझावात उद्या ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिली.

राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून या वडीलरुपी नेत्याने महाराष्ट्राचा दौरा करावा हा आग्रह केला. त्यानुसार उद्या शनिवार ८ जुलै रोजी नाशिक जिल्हयाचा दौरा जाहीर केला आहे. सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन शरद पवारसाहेब निघतील. शरद पवार यांचे ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी यामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जोरदार स्वागत करणार आहेत असेही महेश तपासे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस ही कार्यकर्त्यांची आहे. त्याचे अध्यक्ष शरद पवारसाहेब आहेत. पदावर नुसती नियुक्ती जाहीर करुन होत नसते तर त्यासाठी क्रियाशील सदस्यांची बैठक घ्यावी लागते, त्यामध्ये ठराव घ्यावा लागतो. त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होते. प्रफुल पटेल यांनी सुनील तटकरे यांची निवड केली ती स्वतः केली. त्यांची क्रियाशील सदस्यांची बैठक झाली नाही. आणि काल राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली, त्यामध्ये २४ प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला. तसा ठरावही झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
देशपातळीवर अनेक नेत्यांनी शरद पवारसाहेब यांना पाठिंबा दिला आहे. स्वतः राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आता बंगळुरूमध्ये होणार्‍या विरोधी पक्षांच्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली.

नियमबाह्य काय आहे हे जनता ठरवू दे त्यांनी सांगून काही होत नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब आहेत. २४ राज्यामध्ये पक्षाचा विस्तार आहे. अनेक ठिकाणी निवडणूक लढवली आहे. महाराष्ट्रात काही आमदारांच्या सह्या घेऊन स्वतः ला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करु शकत नाही. केरळमध्ये आमदार आहेत तिथे सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत. लक्षद्वीपमध्ये खासदार आहे. नागालँडमध्ये आमदार आहेत. या सर्वांनी शरद पवारसाहेबच राष्ट्रीय अध्यक्ष अशी घोषणा केली व तसा ठरावही केला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

एकाच कुटुंबातील लोक एकत्र येत असतील तर आनंद आहे परंतु कुटुंब फोडण्याची परंपरा ही भाजपाची आहे हे सर्वांना चांगलेच माहीत आहे असा टोला महेश तपासे यांनी दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाजपला लगावला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *