Breaking News

राजस्थानात आता भाजपाकडून व्हाया शिंदे राजेंद्रसिंह गुडा प्रयोग वसुंधरा राजे यांच्याऐवजी आता राजेंद्र सिंह गुढा यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा

राजस्थानमध्ये काँग्रेसला भगदाड पाडून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या माध्यमातून भाजपा आघाडीचे सरकार बसविण्याचा प्रयत्न भाजपाच्या अंगाशी आला. त्यामुळे वर्षाअखेर राजस्थान विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना शह देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून राजेंद्रसिंह गुडा यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे.

सर्व साधारणतः कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणूका आल्या की, भाजपाकडून प्रचारक म्हणून सर्वाधिक जाहिर सभा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि नंतर अमित शाह व त्यानंतर जे पी नड्डा यांच्या जाहिर सभांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार भाजपाने या क्रमाने जाहिर सभांचे आयोजनही केले. पण आतापर्यंत दोन वेळा मुख्यमंत्री पदी राहिलेल्या वसुंधरा राजे यांना मात्र यावेळी जाणीवपूर्वक भाजपाने निवडणूकीपासून दूर ठेवले. त्यामुळे यंदाच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत वसुधंरा राजे नसणार असे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.

तसेच राजस्थानात प्रदेश भाजपामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या रणनीतीचा सामना देता येणे अवघड होत असल्याने एकेकाळी अशोक गेहलोत यांचेच विश्वासू सहकारी असलेल्या राजेंद्रसिंह गुढा यांना थेट भाजपामध्ये प्रवेश देण्याऐवजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देत आपला मार्ग सुकर करू घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजस्थानात काँग्रेसचे आमदार आणि लाल डायरीमुळे चर्चेत असलेल्या राजेंद्रसिंह गुडा यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष वाढीसाठी राजेंद्रसिंह यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर घरात राहुन किंवा नुसते ऑनलाईन राहुन पक्ष वाढत नसतो असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव घेता लगावत पक्षाच्या वाढीसाठी लोकांमध्ये जावे लागते, कामं करावी लागतात असे पत्रकार परिषदेत सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *